स्वच्छ भारत, हरित भारत

स्वच्छ भारत, हरित भारत
Published on: 
NSK26H32238 जळगाव : ‘स्वच्छ भारत, हरित भारत’ उपक्रमातंर्गत तयार केलेल्‍या पोस्‍टरसोबत विद्यार्थी. –––– ‘स्वच्छ भारत, हरित भारत’वर विद्यापीठात जनजागृती उपक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) पथकाच्या वतीने ‘स्वच्छ भारत, हरित भारत’ या संकल्पनेवर आधारित पोस्टर निर्मिती व परिसर स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात २९ एनसीसी कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे हा होता. पोस्टर निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छ परिसराचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कॅडेट्सनी स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण संरक्षण, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरापेटीचा योग्य वापर आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट यांसारख्या विषयांवर रंगीत व संदेशपूर्ण पोस्टर्स तयार केली. तर प्रत्येक कॅडेटने आपल्या पोस्टरमागील संकल्पना आणि संदेश उपस्थितांसमोर मांडला. दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या सवयींमधून स्वच्छता राखता येते, हा संदेश या माध्यमातून देण्यात आला. कुलगुरू प्रा. व्ही एल माहेश्वरी यांच्या नेतृत्वात एनसीसीचे प्रा. रोहन कोष्टी, एनसीसीच्या प्रशिक्षिका सृष्टी पांड्या यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com