पान-१ मेन
‘स्वच्छ शौचालय-गरिमामय भविष्य’ अभियानाचे क्लिप आर्ट घेणे....
जिल्ह्यात ‘स्वच्छ शौचालय-गरिमामय भविष्य’ अभियान
संयुक्त राष्ट्र संघाची संकल्पना : शौचालयांचा नियमित वापर होण्यासाठी जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १८ : ग्रामीण भागातील सार्वजनिक, सामुदायिक शौचालये तसेच संस्थात्मक शौचालयांची कार्यक्षमता, सुरक्षितता व सुलभता यात सुधारणा करण्यासाठी जलशक्ती मंत्रायाच्या पेयजल व स्वच्छता विभागातर्फे जागतिक शौचालय दिनानिमित्त गुरुवार (ता. १९)पासून नंदुरबार जिल्ह्यात ‘स्वच्छ शौचालय -गरिमामय भविष्य’ अभियान सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी दिली.
..................
दर वर्षी १९ नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिन साजरा होतो. या वर्षी संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक शौचालय दिनाची ‘सुरक्षित शौचालये, समान भविष्य’ ही संकल्पना निश्चित केली आहे. अभियानाची सांगता १० डिसेंबरला मानवाधिकारदिनी होणार आहे.
अभियानांतर्गत ग्रामीण भागातील सार्वजनिक, सामुदायिक शौचालये तसेच संस्थात्मक शौचालयांची कार्यक्षमता, सुरक्षितता व सुलभता यात सुधारणांवर भर देण्यात येणार आहे. महिला, शालेय विद्यार्थिनी व दिव्यांग व्यक्तींच्या गरजांकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे.
दुरुस्ती यंत्रणा बळकट करणार
शौचालयांची आवश्यकतेनुसार तपासणी, दुरुस्ती व पुनर्स्थापना करणे तसेच संबंधित प्राधिकरणांच्या समन्वयाने त्यांच्या देखभाल व दुरस्ती यंत्रणेचे बळकटीकरण, संस्थात्मक शौचालयांशी संबंधित प्राधिकरणे, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कार्यवाही करणे, आवश्यकतेनुसार वैयक्तिक कुटुंबांना त्यांच्या वैयक्तिक घरगुती शौचालयांची दुरुस्ती व देखभालीसाठी प्रोत्साहित करणे, ग्रामपंचायत, गावासाठी आवश्यक शौचालय प्रकारांचे मूल्यांकन करणे आणि खड्डा शौचालये व सेप्टिक टँक शौचालयांचे अद्ययावतीकरणावर भर दिला जाणार आहे.
मैला गाळ व्यवस्थानावर भर
मैला गाळ व्यवस्थापन नियमांचे अनुपालन निश्चित करण्यासाठी आवश्यकतेनुसार यांत्रिक पद्धतीने गाळ उपसण्याचे मूल्यांकन व नियोजन केले जाईल. वर्तन बदल संवाद आणि जनजागृतीतून समुदायातील शौचालयांचा नियमित वापर करावा, यावर भर दिला जाईल. साबणाने हात धुण्याच्या सवयीस प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येतील. सुरक्षित स्वच्छता, मैला गाळ व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली जाईल.
..........
चौकट ---
ग्रामपंचायतीसह शाळांचा सहभाग
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत ग्रामस्तरावर शाळा तसेच सर्व सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता आणि वैयक्तिक शौचालयांचा १०० टक्के वापर करण्यासाठी सरपंच, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पदाधिकारी, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश मोरे यांनी केले आहे.
----------
शौचालयांची वर्षभरातील स्थिती
वार्षिक शौचालये निर्मितीचे उद्दिष्ट - ३४७
बांधकाम पूर्ण झालेली शौचालये - ३०५
प्रगतिपथावरील शौचालये - ४२
-------------
वैयक्तिक शौचालयांची स्थिती
शौचालये निर्मितीचे उद्दिष्ट- २३ हजार २२९
बांधकाम पूर्ण झालेली शौचालये - १३ हजार ९०३
प्रगतिपथावरील शौचालये- नऊ हजार ३२६
--------------
कोट----
ग्रामीण भागात सार्वजनिक शौचालयांचा वापर वाढविणे हा अभियानाचा उद्देश आहे. यात शौचालयांची दुरुस्ती करणे, यांत्रिक पद्धतीने गाळ उपसणे, गावाला किती शौचालयांची आवश्यकता आहे, याचे मूल्यांकन करण्यावर भर देण्यात येणार आहे.
गणेश मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार