येसगाव- कसमादे जलसिंचन पट्ट्यात यावर्षी उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. गव्हाची जागा या हंगामात उन्हाळ कांद्याला मिळाल्याने क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. साठवण करण्यासाठी उन्हाळ भगव्या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा उत्पन्न जास्त असल्याने कांदा साठविण्यासाठी कच्च्या चाळींची संख्या वाढली आहे. तर अनेक ठिकाणी कांदा चाळींची साफसफाई सुरू झाली आहे.