Nashik News : वावरेनगर उद्यानाच्या स्वच्छतेस सुरवात; पोलीस गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Repairing starts

Nashik News : वावरेनगर उद्यानाच्या स्वच्छतेस सुरवात; पोलीस गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी

सिडको (जि. नाशिक) : परिसरातील वावरेनगर उद्यानाची झालेली दुरवस्थेबाबत ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसारित झाल्यानंतर उद्यान विभागातर्फे उद्यानातील स्वच्छतेसह खेळण्यांच्या दुरुस्ती करण्यास सुरवात केली आहे. (Cleaning of Vavrenagar Park begins Citizens demand to increase police patrol Nashik News)

सिडको परिसरातील वावरेनगरमध्ये असलेल्या वावरे उद्यानामध्ये समस्यांना सोडविण्याच्या हालचालींना वेग आला असून सोमवारी (ता. ९) महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उद्यानात येऊन उद्यानातील वाढलेले गाजर गवत कापणे, उद्यानात पाणी मारणे, जॉगिंग ट्रॅक स्वच्छ करणे आदी कामे हाती घेतली आहे.

कामे सुरू झाल्याने उद्यान कायमस्वरूपी अशा स्थितीमध्ये असल्यास नागरिकांना खऱ्या अर्थाने याचा उपयोग घेता येईल अशा प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांमधून उमटल्या. तसेच, काम सुरु झाल्याने स्थानिक रहिवाशांनी सकाळचे आभार मानले आहे.

उद्यान विभागातर्फे उद्यानाची स्वच्छता सुरू झाली असली तरी, येणाऱ्या प्रेमीयुगुलांवर व मद्यपी आणि गावगुंडांवर पोलिस प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे असताना उद्यानाच्या बाहेर पोलिसांनी स्कॅन कोड लावावा व सकाळ व सायंकाळी येथे पोलिसांची गस्त सुरू करावी, जेणेकरून उद्यानातील टवाळखोरांचा वावर कमी होण्यास मदत होईल अशी आशा स्थानिक नागरिकांना आहे.


हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

हेही वाचा: Nashik News: तक्रारी, चौकशीने जिल्हा बॅंक प्रशासक नाराज? कामकाजाचा अहवाल सहकार आयुक्तांना सादर

"वावरे नगर उद्यानाचे झालेल्या दुरवस्थेबाबत ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसारित झाल्यानंतर जी समस्या आम्ही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सोडू शकत नव्हतो. ती समस्या सुटण्यास सुरवात झाल्याने मनस्वी आनंद होत आहे. उद्यान कायमस्वरूपी अशा सुस्थितीत राहिले तर उद्यानाचा उपयोग नागरिकांना घेता येणार आहे." - संगीता जाधव, गृहिणी

"उद्यानाची अवकळा संपली असून उद्यानामध्ये येणाऱ्या मद्यपी टवाळखोर गावगुंड व प्रेमीयुगुलांवर कार्यवाही कधी होईल हा प्रश्न अजून देखील अनुत्तीर्ण आहे. याबाबत स्थानिक पोलिसांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे. यावर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे."

- जयश्री कोल्हे, गृहिणी

हेही वाचा: Nashik News : ZPसमोर दीड महिन्यात तब्बल 190 कोटी खर्चाचे आवाहन!

टॅग्स :NashiknmcGarden