धुळे : टुडे पान १ साठी..
--
फोटो क्रमांक : 31408
निजामपूर-जैताणे : ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२६’ च्या समारोपप्रसंगी सामूहिक स्वच्छता शपथ घेताना मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार. शेजारी निशा जाधव, जयश्री सार्वे, डॉ. सचिन बोडके, शशिकांत सोनवणे आदी.
--
स्वच्छ अन् सुंदर गावासाठी लोकसहभाग महत्त्वाचा
--
सीईओ बेलदार : निजामपूर- जैताणे येथे स्वच्छता ही सेवा अभियानाचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध असून गावात शाश्वत स्वच्छता कायम राखत गाव स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी केले. निजामपूर- जैताणे (ता. साक्री) येथे स्वच्छता ही सेवा अभियान २०२६ च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानाचा समारोप निजामपूर व जैताणे ग्रामपंचायतींच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात झाला. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निशा जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, विस्तार अधिकारी जगदीश खाडे, पी. जी. मोरे, अरुण गांगुर्डे आदी उपस्थित होते. सीईओ बेलदार म्हणाले, की गावामध्ये शाश्वत स्वच्छता कायम राहावी आणि गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने शासनाने २०१४ पासून स्वच्छ भारत मिशन सुरू केले. हे अभियान केवळ शासनाचे नसून यामध्ये जनसहभाग महत्त्वाचा आहे. भविष्यात ग्रामस्थांनी सांघिक प्रयत्नातून आपले गाव राज्य आणि देश पातळीवर नावलौकिकास पात्र ठरवावे, असे आवाहन त्यांनी केले.
-
१४-१
..चौकट..
१४-१
पीपीई किट्सचे वाटप
उपमुख्य कार्यकारी अधिकारी निशा जाधव यांनी अभियानाची पार्श्वभूमी व राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. या अभियानांतर्गत झालेल्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच या वेळी झालेल्या सफाई मित्र आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराला प्रतिसाद मिळाला. सफाई कामगारांना सुरक्षेची साधने म्हणून पीपीई किट्सचे वाटप करण्यात आली. उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. दीपक पाटील, मनोज जगताप, प्रशांत देव, विजय हेलिंगराव, वैभव सयाजी, निजामपूर ग्रामपंचायत अधिकारी राहुल मोरे, जैताणे ग्रामपंचायत अधिकारी अनिल राठोड आदीनी संयोजन केले. गटविकास अधिकारी सोनवणे यांनी आभार मानले.
--