Sakal Sting Operation : ‘शिवशाही’चा प्रवास ठरतो जिवाशी खेळ

broken headlight despite the long journey of 'Shivashahi' & Absence of first aid box in Shivshahi bus.
broken headlight despite the long journey of 'Shivashahi' & Absence of first aid box in Shivshahi bus.esakal

नाशिक : आठवडाभरात वेगवेगळ्या तीन अपघातांमुळे शिवशाहीचा प्रवास खरंच सुरक्षित राहिला आहे का, असा विचार करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. देखभाल-दुरुस्‍तीकडे दुर्लक्षापासून तर बसमध्ये प्रथमोपचार पेटी, आपत्कालीन यंत्रणेचा वानवा असल्‍याचे ‘सकाळ’च्‍या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आले आहे. असे असताना रस्‍त्‍यावर धावणाऱ्या या शिवशाहीतून प्रवाशांच्‍या जिवाशी खेळ सुरू असल्‍याची धक्‍कादायक स्‍थिती समोर येत आहे. (clear disregard for maintenance First aid kit emergency system kit at shivshahi sakal sting operation nashik news)

प्रवास सुखकर करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरवातीला शिवनेरीच्‍या माध्यमातून वातानुकूलित प्रवासाची सुविधा उपलब्‍ध करून दिली होती. त्‍यानंतर शिवशाही बस आल्‍या. परंतु प्रवासी वाहतुकीच्‍या दृष्टीने या बस कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे. आठ दिवसांत शिवशाहीला अपघाताच्‍या तीन घटना घडल्या आहेत. या तिन्ही घटना मोठ्या असल्‍या तरी किरकोळ अपघाताचेही प्रकार वाढले आहेत. असे असतानाही राज्य परिवहन महामंडळ उपाययोजना करत नसल्याचे चित्र आहे.

कोरोना, संपाने बिघडले बसगाड्यांचे स्‍वास्‍थ्‍य

कोरोना महामारीचा काळ आणि नंतरचा एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे सर्वच बसगाड्या आगारात उभ्या होत्‍या. शिवशाहीच्‍या देखभाल-दुरुस्‍तीसाठी कोविडकाळात काही सामग्री घेण्यात आली होती. परंतु तीही पडून राहिल्‍याने कालबाह्य झाल्‍याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. कोरोना महामारी तसेच संपकाळात शिवशाही बसगाड्यांचे तांत्रिकदृष्ट्या स्‍वास्‍थ्‍य बिघडल्‍याचे बोलले जात आहे.

पाहणीतील धक्‍कादायक बाबी

- अनेक बसचा पुढील, मागचा भाग ‘डॅमेज’

- आरसे तुटल्‍याने तात्‍पुरता केलाय जुगाड

- बहुतांश बसमध्ये प्रथमोपचाराची पेटी गायब

- आपत्‍कालीन परिस्‍थितीत गरजेचा हातोडा शोधून सापडेना

- काही बसगाड्यांच्‍या पुढील काचेला गेलेत तडे

- आसनांची मोडतोड, देखभाल- दुरुस्‍तीचा अभाव

- फलाटावर बसगाड्या सुरू ठेवून चालकांचा आवारात वावर

broken headlight despite the long journey of 'Shivashahi' & Absence of first aid box in Shivshahi bus.
Nashik Crime News : उसनवारीच्या वादातून मद्याच्या नशेत खून; हत्येचा 12 तासांत उलगडा

अपघातांच्‍या घटना अशा-

- २६ ऑक्‍टोबर (दुपारच्‍या वेळी) ः चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने नाशिक-पुणे मार्गावर धावत्‍या शिवशाहीचा शिखरेवाडीजवळ अपघात. धडकेत थेट विजेचा खांब वाकला. बसच्‍या ॲक्सिलेटरला वायर नसल्‍याने ते दोरीने बांधल्‍याचा धक्‍कादायक प्रकार या घटनेत आला समोर.

(ही शिवशाही महामंडळाची होती)

- २५ ऑक्‍टोबर (सकाळी अकाराच्‍या सुमारास) ः पुण्यासाठी सुटलेल्‍या शिवशाहीचा सिन्नर परिसरातील गुरेवाडी शिवारात अपघात. चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने दुभाजकावर बस धडकली. चालकाने मद्यपान केल्याचे निष्पन्न (ही शिवशाही बस खासगी होती).

- २ नोव्‍हेंबर (सकाळच्‍या वेळी) ः नाशिक-पुणे महामार्गावरील माळवाडी शिवार परिसरात शिवशाहीने अचानक पेट घेतला. बघता बघता बसगाडी जळून खाक झाली. बसमधील सर्व ४३ प्रवासी सुखरूप. (ही शिवशाही पुणे आगारातील होती).

नाशिक विभागातील शिवशाहीची स्‍थिती-

महामंडळाच्‍या बस---५३

खासगी बस--------१९

"शिवशाही अपघाताच्‍या घटनांबाबत यंत्र अभियंता (चालन) यांच्‍यामार्फत सविस्‍तर चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्‍यानंतर आवश्‍यक ती कारवाई केली जाईल. आगारप्रमुखांना शिवशाही बसगाड्यांची देखभाल-दुरुस्‍तीच्‍या सूचना केल्‍या आहेत. खासगी शिवशाहीसंदर्भातही संबंधितांना सतर्कता बाळगण्याच्‍या सूचना केल्‍या आहेत."

- अरुण सिया, विभागीय नियंत्रक, नाशिक.

broken headlight despite the long journey of 'Shivashahi' & Absence of first aid box in Shivshahi bus.
Wildlife Census : वन्यजीव प्रगणनेला उजाडणार नवीन वर्ष; वनविभागाचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com