नाशिक- वेळी-अवेळी होणाऱ्या पावसाचा परिणाम पिकांवर जाणवू लागला आहे. लांबलेला पाऊस आणि त्यामुळे पिकांचे कोलमडलेले वेळापत्रक पाहता वातावरणानुसार पीकपद्धतीत बदल करणे, हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. कृषी विभागाच्या पुढाकाराने त्यावर मात करणे शक्य असल्याचा सूर हवामान व कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.