Heavy Rain Damage : नळकसला ढगफुटीसदृश्‍य पावसाचा हाहाकार; शेतकरी हतबल

Sudeep Pawar, a progressive farmer, has accumulated water in his onion field due to rain on Wednesday at Nalkas
Sudeep Pawar, a progressive farmer, has accumulated water in his onion field due to rain on Wednesday at Nalkasesakal

नामपूर (जि. नाशिक) : नळकस (ता. बागलाण) येथे बुधवारी (ता. १२) झालेल्या ढगफुटीसदृश्‍य पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. महसूल व कृषी प्रशासनाने याकामी लक्ष घालून तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (cloudburst heavy rain at Nalkas Farmers desperate Nashik Latest Marathi News)

Sudeep Pawar, a progressive farmer, has accumulated water in his onion field due to rain on Wednesday at Nalkas
Sakal Anand Mahotsav : ‘नाटक कट्टा’च्या कलाकारांनी फुलविले चौफेर हास्य

नळकस परिसरात यंदा जून महिन्यापासून झालेल्या पावसामुळे मका, बाजरी, सोयाबीन आदी खरीप पिकांसह भाजीपाला, डाळिंब आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने शेतकाऱ्यांवरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात एक ते दीड फूट पाणी असल्याने पावसाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्यासाठी सोळाशे ते दोन हजार रुपये किलो दराने कांद्याचे बियाणे खरेदी केले असून, कांद्याच्या रोपांची लागवड केली आहे.

अशातच धुवादार पावसामुळे ‘पैसा गेला पाण्यात’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात आर्थिक मदत करावी, अशी मागणी सरपंच गोरख देवरे, उपसरपंच सीमा बोरसे, ग्रामपंचायत सदस्य सुनील देवरे, आशा पवार, हिम्मत देवरे, उषा देवरे, सामाजिक कार्यकर्ते सुदीप पवार, माजी उपसरपंच विश्‍वास बोरसे, पोलिसपाटील विश्‍वास देवरे आदींनी केली आहे.

Sudeep Pawar, a progressive farmer, has accumulated water in his onion field due to rain on Wednesday at Nalkas
Special Parcel Train : शेतकऱ्यांसाठी विशेष पार्सल ट्रेन सुरू; या दिवशी धावणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com