Nashik : विद्यार्थ्यांसाठी कोडिंग क्लब

coding
codingesakal

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालय (Collector's Office) आणि महापालिकेतर्फे (NMC) राबविण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील अटल कौशल्य योजनेच्या (Atal Kaushalya Yojana) धर्तीवरील टिंकरिंग प्रयोगशाळेतर्फे विविध उद्योग आणि शैक्षणिक भागीदारांसह नाशिक कोडिंग क्लब (Coding Club) उपक्रम राबविला जाणार आहे. त्याअंतर्गत येत्या २५ जूनला अंबड येथील विनजितच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरमध्ये कार्यक्रम होणार आहे. नाशिक कोडिंग क्लबचे रामाशीष भुतडा यांनी ही माहिती दिली. (Coding Club for Students Nashik News)

जिल्हा नियोजन समिती आणि महापालिकेतर्फे उभारलेल्या या अद्ययावत लॅबमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संगणक शास्त्र, सॉफ्टवेअरतज्ज्ञाच्या मदतीने संगणक, सायन्स याविषयीची माहिती देणारे व्यासपीठ सुरू केले जाणार आहे. पूर्णतः मोफत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत माहिती मिळविता येणार आहे. केंद्र शासनाने अटल कौशल्य विकास योजनेच्या धर्तीवर नाशिकला सायन्स सेंटर उभारण्यात आले. त्यात, औद्योगिक यांत्रिकीकरणापासून तर इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकविषयक तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना प्रयोग स्वरूपात माहिती देण्याची सोय आहे. महापालिकेच्या तारांगणाच्या प्रांगणातही सायन्स लॅब आहे. हा उपक्रम पूर्णतः मोफत असणार आहे.

coding
SSC Result : जिद्द, कष्टाच्या जोरावर फरहात शेखचे यश

तंत्रज्ञान शिकण्याची संधी

उपक्रमात संगणकीय प्रोग्रॅमिंग भाषा, विकासकृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटलिजन्स) मशिन लर्निंग, डेटा सायन्स, भौगोलिक माहिती प्रणाली आणि नकाशे तंत्रज्ञान आधार, यूपीआय, नकाशे, ॲप्लिकेशनचा वापर याविषयी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. दर महिन्याला किमान दोन वैयक्तिक आणि ऑनलाइन कार्यक्रमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. यात अमेरिकेतील कोड डे (Code.org) एक नामांकित ना-नफा संस्थेची मदत घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यचा संगणक शास्त्रात रस वाढविण्याचा हा उपक्रम आहे. याचा पहिला कार्यक्रम २५ जूनला अंबड येथील विनजितच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरमध्ये होणार आहे.

coding
शंकर महाराजांचे समकालीन भक्त ‘योग योगेश्‍वर जय शंकर’च्या सेटवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com