Nashik News : थंडी, धुक्याने भरली हुडहुडी; द्राक्षनगरीचा पारा घसरला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saturday morning brought a blanket of fog over the vineyard.

Nashik News : थंडी, धुक्याने भरली हुडहुडी; द्राक्षनगरीचा पारा घसरला!

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : द्राक्षनगरीसाठी शनिवारची (ता. ७) सकाळ धुक्याची चादर घेऊन आली. सकाळी नऊपर्यंत धुक्याने पिंपळगाव शहराला वेढले होते. तापमानात घसरण होऊन पारा दहा अंशाच्या खाली काही काळ स्थिरावला.

त्यामुळे थंडी व धुक्याने द्राक्षनगरीला हुडहुडी भरली. शनिवारी दिवसभर सूर्यनारायाणाचे दर्शनच क्वचितच झाले. बोचरी थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे स्वेटर, कानटोपी घालूनच नागरिक घराबाहेर पडले. थंडी वाढल्याने द्राक्षघडांची वाढ थांबणार आहे. (Cold foggy mercury fell winter season cold weather at niphad Nashik News)

वातावरणातील मोठा बदल आज पिंपळगावकरांनी अनुभवला. सकाळपासूनच दाट धुके पसरल्याने वीस फुटावरील काहीही दिसत नव्हते. सकाळी नऊनंतर धुके निवळले. पण दिवसभर थंड वाऱ्यामुळे गारठा कायम होता. त्यापासून दिलासा मिळविण्यासाठी दिवसाच अनेक ठिकाणी शेकोट्या पेटविण्यात आल्या.

जसजशी संध्याकाळ झाली तसतशी शेकोट्यांची संख्याही वाढली. थंडीमुळे अनेकांनी आजचा दिवस घरातच घालविला. यंदाच्या हंगामातील धुक्याने वेढलेला पहिला दिवस आज पिंपळगावकरांनी अनुभवला. धुक्याची चादर पसरल्याने उबरदार वस्त्र परिधान करून नागरिक घराबाहेर पडत होते.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Chhagan Bhujbal | महागाई, बेरोजगारीकडे दुर्लक्ष करण्यासाठी निरर्थक गोष्टींवर चर्चा : भुजबळ

आल्हादायक वातावरणामुळे सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्याही वाढली होती. वातावरणातील बदलामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्यास सुरवात झाली असून सर्दी, खोकल्याचे आजार जडत आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावरी वाहतुक धुक्यामुळे सकाळच्या सत्रात मंदावली होती.

द्राक्षघडांची वाढ खुंटणार

थंडी व धुक्यामुळे द्राक्षशेतीही प्रभावीत झाली आहे. परिपक्व होत असलेल्या द्राक्षघडांची वाढ खुटणार आहे. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव संभवू शकतो. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिके जोमात होती. मात्र, आता ढगाळ हवामान व सकाळी पडणारे दाट धुके, यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याचा धोका आहे.

हेही वाचा: Nashik Corruption News : कुऱ्हेगावच्या दलितवस्ती सुधार योजनेत चौदा लाखांचा भ्रष्टाचार!

टॅग्स :NashikNiphadWinter