Fogg
Foggesakal

Winter Season : इगतपुरी तालुक्यात थंडीची लाट; ढगाळ वातावरणासह पसरली धुक्याची चादर!

Published on

इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी शहरासह तालुक्यात थंडीचा कडाका वाढला असून, शनिवारपासून (ता.७) ढगाळ वातावरण आहे. रविवारी (ता.८) दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले. त्यामुळे सूर्यनारायणाचे दर्शनही दुर्लभ झाले. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही मोठी घसरण झाली असून, कमाल तापमान १४.९ अंश सेल्सिअस होते. दिवसाही शीतलहरींमुळे गारठा कायम असल्याचे चित्र होते. (Cold wave in Igatpuri taluka A sheet of fog spread with cloudy atmosphere Winter Season nashik news)

अनेकांनी दिवसा स्वेटरचा, तर रात्री शेकोटीचा आधार घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले. हिवाळा ऋतू दिवाळीनंतर सुरू झाला असला तरी नोव्‍हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात क्वचितच बोचऱ्या थंडीचा अनुभव इगतपुरीकरांनी घेतला. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून थंडीमुळे घोटी इगतपुरीकर गारठत आहेत.

इगतपुरी तालुक्यात सलग दोन दिवस तापमान कमी नोंदविले गेले आहे. त्यामुळे सकाळी थंडीचा कडाका जाणवत असला तरी दिवसाही शीतलहरींमुळे वातावरणात गारवा जाणवतो आहे. उत्तर भारतात झालेल्‍या बर्फवृष्टीमुळे आपल्याकडेही काही दिवसांपासून तापमानात घसरण सुरू झाली आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Fogg
Kamgar Kalyan Spardha : रंगांच्या आड लपलेले रहस्य ‘फेंट’!

किमान तापमान सरासरीच्या खाली

सध्या सकाळी, सायंकाळी दोन्ही सत्रात तापमानात घट होत असून येत्या काही दिवसात रात्रीचा गारवा वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या आसपास आले आहे. नाशिक, नगर, महाबळेश्वर आदी ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे.

तर पुणे, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या आसपास आहे. यंदा इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला असल्याने यंदा थंडीच्या विक्रमाबरोबरच थंडीचा मुक्काम देखील वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात सध्या गुलाबी थंडीचे आगमन झाले असून मुंबई आग्रा महामार्गासह कसारा घाट परिसरात धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.

Fogg
Uddhav Thackeray Group : ठाकरे गटात पन्नास कार्यकर्त्यांचा प्रवेश! संजय राऊत यांच्याकडून स्वागत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com