Weather
sakal
नाशिक: शहर-जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात सध्या थंडीची तीव्र लाट पसरली. शनिवारी (ता. १३) पाऱ्यात किरकोळ वाढ नोंदविण्यात आली असली, तरी शीतलहरींमुळे वातावरणातील गारठा कायम आहे. नाशिकचे किमान तापमान ८.६ अंश, तर निफाडचे किमान तापमान ६.३ अंश सेल्सियस नोंदविले गेले. जळगाव येथे किमान तापमान सात अंश सेल्सियस इतके राहिले.