वातावरण बदलाने आजार वाढले

वातावरण बदलाने आजार वाढले
Published on: 
टुडे पान ३, मेन फिचर --- (थंडी,तापाच्या रुग्णाचे संग्रहित छायाचित्र किंवा स्केच वापरावे) --- वातावरण बदलाने वाढले सर्दी, तापाचे रुग्ण (उपशीर्षक) फटाक्‍यांच्‍या धुरामुळे घशाचाही त्रास; शे-चिवड्याने टाकली भर सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. ९ : वातावरणातील बदल, वाढलेला गारवा आणि दिवाळीत फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यातच फटाक्यांच्या धुरामुळे घशात खवखव, खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दुसरीकडे, दिवाळीच्या फराळातील शेव, चिवडा आणि इतर तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे याचा देखील त्रास जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानातील फरकामुळे सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. तर मागील दोन दिवसांपासून सकाळी आणि रात्री जाणवणारा गारवा वाढला आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. प्रामुख्‍याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास जाणवू लागला आहे. अनेकांना सर्दी व खोकल्‍याचा त्रास होत असल्‍याच्‍या तक्रारी असून रुग्णालयात देखील संख्‍या वाढली आहे. फटाक्यांच्या धुराचाही त्रास दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आल्याने परिसरात धूर आणि धुळीचे प्रमाण वाढले होते. या धुरामुळे घशात खवखव, कोरडा खोकला, डोळ्यांची जळजळ तसेच श्वास घेण्यास त्रास जाणविल्‍याच्‍या तक्रारी वाढल्‍या आहेत. आधीच सर्दी-खोकल्याचा त्रास असलेल्या नागरिकांना धुरामुळे अधिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे. तेलकट खाण्याचा त्रास दरम्‍यान मागील आठ दिवसांपासून दिवाळीच्या पाश्‍र्वभुमीवर घराघरांत फराळ तयार केला गेला आहे. शेव, चिवडा, चकली, करंजी आणि लाडू अशा पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. तेलकट, मसालेदार पदार्थांचे अतिसेवन आणि अनियमित आहारामुळे काही नागरिकांना अपचन, ॲसिडिटीसारख्या तक्रारी वाढू लागल्‍या आहेत. इन्‍फो बदलत्या हवामानात काळजी महत्‍त्‍वाची वातावरणातील बदल लक्षात घेता नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, स्वच्छ आणि ताजे अन्न खाणे, धुराच्या संपर्कापासून शक्यतो दूर राहणे तसेच थंडीपासून बचाव करणे आवश्यक आहे. ––––––– कोट मागील तीन– चार दिवसांपासून थंडी वाढली असल्‍याने वातावरणातील या बदलाचा परिणाम अनेकांना जाणवत आहे. यातच दिवाळीचा फराळ खाण्यात येत असल्‍याने सर्दी, खोकला, ताप व घसा खवखवण्याचा त्रास वाढला आहे. – डॉ. राहुल पाटील, चामुंडाई क्‍लीनिक, जळगाव. ––––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.