Latest Marathi News | 5 दिवसात 299 गणेशमूर्तींचे संकलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Murti Sankalan

Nashik : 5 दिवसात 299 गणेशमूर्तींचे संकलन

जुने नाशिक : दीड ते सात दिवस मूर्तीची स्थापना करून विसर्जन करण्याची काही जणांची प्रथा आहे. त्यानुसार पूर्व विभागीय कार्यालयाकडून पाच दिवसात २९९ गणेशमूर्तींचे संकलन केल्याची माहिती विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट यांच्याकडून देण्यात आली.

गणेशोत्सवानिमित्त घरोघरी गणरायाचे आगमन होत स्थापना केली जाते. प्रत्येकाचे कौटुंबिक परंपरेनुसार बाप्पाची स्थापना आणि विसर्जन केले जाते. त्यानुसार काहींकडून दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सहा दिवस तर काहींकडून सात दिवस बाप्पाची स्थापना करत विसर्जन केले जाते. त्यानुसार गेल्या आठ दिवसातील पाच दिवसांमध्ये अशा विविध दिवसांच्या गणरायाचे विधीवत विसर्जन करण्यात आले.

पूर्व विभागीय कार्यालयाचा विचार केला, तर पाच दिवसात त्यांच्याकडून २९९ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. अशाप्रकारे विसर्जन करण्याची फार कमी कुटुंबीयांची परंपरा असल्याने मूर्ती संकलनाचे प्रमाण दहाव्या दिवसांच्या तुलनेत कमी होते. दहाव्या दिवशी अर्थात शुक्रवार (ता.९) मूर्ती संकलनाचे प्रमाण अधिक असणार आहे. `

त्यानिमित्ताने पूर्व विभागात ११ ठिकाणी विसर्जन, तसेच मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात तीन नैसर्गिक, तर आठ कृत्रिम विसर्जन स्थळाचा समावेश आहे. तर विसर्जनासाठी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ८ किलो बोरिक पावडर आतापर्यंत वाटप करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा: आवक घटल्याने पालेभाज्यांच्या दरात तेजी; पावसामुळे आठवडे बाजारात पळापळ

तारीखनिहाय संकलन

दिवस तारीख मूर्ती संकलन

दीड दिवस १ ४७

तीन दिवस ३ २३

पाचवा दिवस ४ ९१

सहावा दिवस ५ ९४

सातवा दिवस ६ ४४

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांची जय्यत तयारी

Web Title: Collection Of 299 Ganesha Idols In 5 Days Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..