नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन करताना आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सूक्ष्म नियोजन गरजेचे असेल. त्याचबरोबर सायबर गुन्हे, गर्दी अनियंत्रित होणे, अकस्मात आग लागणे, अवकाळी पाऊस यांसारख्या घटना घडण्याची शक्यता असल्याने सर्वच स्तरांतून प्रयत्न करावे लागणार असल्याचा सूर ‘एफसीए २०२५’ चर्चासत्रात मान्यवरांच्या चर्चेतून उमटला.