नाशिक- पहलगाम (काश्मीर) येथील दहशतवादी हल्ल्याचा आजही ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. कळवणला सामूहीक श्रध्दांजली वाहून बंद पाळण्यात आला. सटाण्यात उद्या रविवारी (ता.२७) बंद पुकारण्यात आला आहे..मुस्लिम समुदायातर्फे निषेधयेवला : हिंदू मुस्लिम ऐक्याचे परंपरा जपणाऱ्या येवला शहरातील मुस्लिम बांधवांनी पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदविला. या घटनेतील दहशतवाद्यांचा कायमस्वरूपी खातमा करावा अशी मागणी केली आहे..मालेगावनंतर सर्वाधिक मुस्लिम बहुल असलेले येवला शहर आहे. या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधवांचा सलोखा जपत येथील मुस्लिम समुदाय देखील जम्मू-काश्मीरमधील हल्ल्याच्या निषेधार्थ पुढे सरसावले आहे. कुठलेही दहशतवादी कृत्य अजिबात समर्थनीय नाही.सर्व समाज बांधव गुण्यागोविंदाने नांदत असताना अशा पद्धतीने दहशतवादी कृत्य करणे निंदनीय असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले..अप्पर पोलिस अधीक्षक तेजबीरसिंह संधू तसेच उपअधीक्षक बाजीराव महाजन यांची भेट घेऊन मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेधाचे पत्र दिले. पहलगाम येथे मारले गेलेले सर्व निरपराध पर्यटक आहेत. दहशतवाद्यांचे हे कृत्य मानवतेला काळिमा असणारे असून ही क्रूर घटना असल्याने अशा दहशतवादाचा कायमस्वरूपी खातमा करावा. अशी मागणी केली. सामाजिक कार्यकर्ते अजीज शेख,निसार लिंबूवाले,अकबर शह ,अन्सार शेख, माजी नगरसेवक एजाज शेख, अमजद शेख,मोहसीन हसन, दादाभाई फिटर, फारुख शेख, सज्जाद शेख,अन्सार शेख, इम्रान शेख आदेश मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.