Nashik News | सुट्टीच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहणार : दवंगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malegaon Municipal Corporation latest marathi news

Nashik News | सुट्टीच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहणार : दवंगे

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील सह दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी शनिवारी २५ मार्चला शासकीय सुट्टीच्या दिवशी नियमित वेळेत सुरू राहणार आहे. नाशिकचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी ही माहिती कळविली आहे. (collector Davange statement Office of Joint Sub Registrar will continue on holidays Nashik News)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

मालेगाव शहरातील पक्षकार, बिल्डर व वकील संघाने एप्रिल २०२३ पासून वार्षिक मूल्य दर तक्त्यात संभाव्य वाढीच्या दृष्टीने मार्च २०२३ महिन्यातील शासकीय सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणीकरीता शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. त्याअनुषंगाने शहरातील सह दुय्यम निबंधक वर्ग २ कार्यालय क्रमांक १ ते ३ सुरू ठेवण्यात येणार आहे.