जिल्हा टुडे पान एकसाठी
-----------
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे
परीक्षा शुल्क होणार माफ
फी भरलेल्यांना पैसे मिळणार परत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : राज्य शासनाने २५ सप्टेंबरला जाहीर केलेल्या दुष्काळ निवारण पॅकेज अंतर्गत २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. या अध्यादेशांतर्गत राज्यातील ३४ जिल्ह्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यातील १० वी, १२ वी तसेच महाविद्यालयीन व उच्च व तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले आहे.
परीक्षा अर्ज भरताना शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून फी घेऊ नये असे निर्देश राज्य मंडळांनी दिले आहेत. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांचा समावेश शासनातर्फे करण्यात आला आहे. या विषयी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी यांची युवासेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन सादर केले.
या वेळी युवासेना विभागीय सचिव विराज कावडिया, युवासेना जिल्हा युवाधिकारी नीलेश चौधरी, महानगर युवाधिकारी प्रीतम शिंदे, अजिंक्य पाटील, बलजितसिंग जोहरी, अरविंद चौधरी आदी उपस्थित होते.
चौकट
महाविद्यालयांना पत्र
कुलगुरु माहेश्वरी यांनी विद्यापीठातर्फे सर्व संलग्नित महाविद्यालयांना परिपत्रक काढून सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क न घेता परीक्षा फॉर्म भरून घेण्याचे तसेच फी भरले विद्यार्थ्यांना पैसे परत देण्याचे निर्देशित करण्याचे आश्वासन दिले. राज्यातील दुष्काळी परीस्थिती घोषीत केलेल्या भागातील कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे थांबू नये यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पुढाकार घेत दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शूल्क माफ करण्यात आले आहे. दुष्काळ स्थिती पाहता सरकारने परीक्षा शुल्क माफीचा जी. आर. काढला असून महाविद्यालयांनी खोडसाळपणा करू नये, अन्यथा युवासेनेतर्फे विद्यार्तीही विद्यार्थी हितार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल.
----