श्री भगवतीच्या मुर्ती संवर्धनास प्रारंभ; पहिल्या पायरीवर पर्यायी दर्शनाची व्यवस्था

saptashrungi gad latest marathi news
saptashrungi gad latest marathi newsesakal

वणी (जि. नाशिक) : देशभरातील ५१ शक्तिपीठापैकी एकमेव स्वयंभू शक्तीपीठ समजले जाणाऱ्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगगड (Saptashrungi Gad) या तीर्थक्षेत्रावर त्रिगुणात्मक स्वरुपात असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाच्या (Idol conservation) कामास आज ता. २१ पासून प्रत्यक्षरीत्या प्रारंभ झाला आहे.

दरम्यान मंदिराच्या प्रवेशद्वारावरील पहिला पायरीसमोर आदिमाया सप्तशृंगी मातेची प्रतिकृती असलेल्या मुर्तीची स्थापना करुन ट्रस्टने भाविकांना पर्यायी दर्शनाची व्यवस्था करुन दिली आहे. (Commencement of idol conservation of saptashrungi devi nashik latest Marathi news)

श्री भगवती स्वरुप व मुर्ती सवंर्धन तसेच मंदीर गाभाऱ्याच्या देखभालीचे कामास आज ता. २१ पासून प्रत्यक्षरीत्या सुरुवात झाली आहे. पुढील ४५ दिवसांत नियोजीत असलेले सर्वे कामे पूर्ण करण्याचे नियोजन असून मुदतीत सर्व कामे पूर्ण करण्याचे आव्हान आता नेमणूक केलेल्या सर्व संस्थांचे असणार आहे.

दरम्यान आज ट्रस्टने भाविकांना पर्यायी दर्शनासाठी पहिल्या पायरीवरील ट्रस्टच्या उपकार्यालया समोर वॉटरप्रुप मंडप उभारुन मंडपात अंतर्गत सजावट करुन आदिमायेच्या प्रतिकृतीची स्थापना केली आहे. याच ठिकाणी भाविकांना पुढील ४५ दिवस आदिमायेच्या पर्यायी दर्शन तसेच पायथ्यावरुनच मंदीराच्या कळसाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.

तसेच भाविकांना पुजा विधीसाठी प्रवेशद्वारावरील सभामंडपात पुजाविधीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली असून भाविकांना निवासासाठी ट्रस्टच्या भक्तनिवासाची सुविधा तसेच महाप्रसादालय, धर्मार्थ दवाखाना आदी सुविधा नेहमीप्रमाणेच सुरु राहाणार आहे.

मूर्ती महत्त्व व संवर्धनाची गरज

देवीचे स्वरूप आद्य स्वयंभू प्रकारातील असल्याचे मान्यताप्राप्त आहे, तर काही संदर्भात ५१ शक्तिपीठांपैकी हे एक स्वरूप असल्याचे मानले जाते. श्री भगवतीची मूर्ती जवळपास १० फूट उंच व आठ फूट रूट आकारात व एकूण १८ हातांत भिन्न प्रकारातील अस्त्र व शस्त्र असून, त्यात उजव्या हातात (खालील बाजूकडून वरील बाजूकडे अक्षरमाला, कमल, बाण, खडग, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, परशू, तर डाव्या हातात (खालील बाजूकडून वरील बाजूकडे कमंडलू, पानपात्र, धनुष्य, चर्म, कालदंड शक्ती, पाष, घंटा, शेख आहे.

ही शस्त्र-अस्त्र विविध देवदेवतांची प्रतीके असल्याचे म्हटले जाते. श्री भगवतीची मूर्ती अतिप्राचीन व विश्वातील एकमेव भव्य आकार व प्रकारातील ती एकमेव स्वयंभू मूर्ती आहे. वर्षानुवर्षे त्यावर शेंदूर लेपन सुरु आहे.

तसेच सप्तश्रृंग गडावरील वातावरण, देवीच्या डोंगराच्या कोपयात असलेले मंदिर व त्यातून होत असलेले पाण्याचे झिरपणे यामुळे मूर्तीच्या काही भागांत क्षती पोहोचत असल्याचे पुजारी वर्गाच्या लक्षात येवून पुरोहितांनी सन २०१२ - २०१३ मध्येच विश्वस्त मंडळाकडे मूर्ती संवर्धनाची मागणी करीत पाठपुरावा केला होता.

त्यानूसार सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्टने सर्व पुरातत्व विभाग, आयआयटी पवई यांचे अहवाल व प्रशासकीय परवानगीने पुरातत्व विभागाची मान्यता असलेल्या अंजिक्यतारा कन्सल्टंसी, नाशिक या संस्थेमार्फत संवर्धनाचे काम सुरु केले आहे.

अशा पद्धतीने होणार संवर्धन

श्री भगवती मूर्तीच्या संवर्धनासाठी

मंदिरात आद्रता नियंत्रित ठेवणे, श्री भगवती गाभाऱ्यातील ओलावा कमी करणे, डोंगर परिसराला दिलेला ऑइल पेंट काढून टाकणे, आवश्यक त्या संख्येने पंखे बसवून गाभान्यात हवा खेळती ठेवणे, श्री भगवती स्वरूपाजवळील चांदीमागील पाण्याची बाहेर पडण्याची व्यवस्था करणे, तसेच दैनंदिन पंचामृत महापूजेसाठी वापरले जाणारे विविध साहित्य हे नैसर्गिक प्रकारातील वापरावे, तसेच त्याची वापरासंदर्भातील मात्रा कमी करणे असे आवश्यक त्या सर्व सुचनांचे पालन व संवर्धन पध्दत राहाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com