सेवा हमी आयुक्तांचा कारभार विश्रामगृहातून

राज्यात सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्याचा राज्यात वरच्या स्थानी क्रमांक लागला.
office
officeesakal

नाशिक : राज्यात सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्याचा राज्यात वरच्या स्थानी क्रमांक लागला. त्याबद्दल नाशिक जिल्ह्याचा गौरवही झाला, पण सेवा हमी कायद्याचे पुरस्कर्ते जिल्हाधिकारी गेले आणि सेवा हमी गती मंदावली. इतकेच काय सध्या तर सेवा हमी आयुक्तांना कार्यालयही नाही.

सध्या तर नाशिक विभागाच्या सेवा हमी आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी यांच्या कार्यालयाचा कारभार सध्या शासकीय विश्रामगृहावरून सुरू आहे. राज्यात नाशिक जिल्ह्यात महसूल प्रशासनाने सर्वाधिक १०१ सेवांची हमी दिली, म्हणून नाशिकचा गौरव झाला. काही लाख नागरिकांनी या सेवांचा लाभ घेतल्याचे जाहीर करीत नाशिकला गौरविले गेले होते. मात्र, नाशिक विभाग सेवा हमी आयुक्त गेली सहा महिने त्यांचे ऑफिस गोल्फ क्लबच्या रेस्ट हाऊसवर आहे. तेथील सूटमध्ये त्यांचे तात्पुरते ऑफिस आहे. ना ऑफिस, ना स्टाफ, ना काही सुविधा. मग सेवा हमीच्या कामात राज्यात टॉपवर असलेला जिल्ह्यात त्यांना साधे कार्यालय मिळत नाही. सात वर्ष होऊनही सेवा हमीचा कायदा झाला. मात्र, त्यातील लाभार्थ्यांना लाभाचा विषय दूर पण सध्या तर या विभागाला कार्यालयाचा वाणवा आहे.

office
स्वत:च्या सुरक्षेसाठी ज्येष्ठांनी व्हावे स्मार्ट
office
महाविकास आघाडी सरकारच्या घोटाळ्यांचे ठिकाण नाशिकच : किरीट सोमय्या

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com