नाशिक- प्रत्येक क्षेत्रातील सामाजिक रचना बदलत आहे, त्याप्रमाणे आपणही आपल्या कामांमध्ये बदल करावा. वैचारिकदृष्ट्या कार्यकर्ते घडविताना तरुणांना व महिलांना संधी द्यावी. कम्युनिस्ट पक्ष हा आमचा मोठा भाऊ आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण पुन्हा एकदा लाल बावट्याची ताकद महाराष्ट्राला दाखवून देऊ, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी केले.