नाशिक- संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या पक्षालाच आता पुन्हा मराठी भाषेच्या रक्षणासाठी लढा उभारावा लागणार आहे. लोकशाही, संविधान मूल्य, शेतकरी, कामगार वाचविण्यासाठी लढावे लागेल. कम्युनिस्ट पक्षाने गेल्या काही दशकांत भारतीय लोकशाहीला बळकट करताना आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. यापुढेही त्याप्रकारे वाटचाल सुरू राहील. लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी लढावे लागेल, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो यांनी केले.