आगीत राखरांगोळी झालेला संसार उभा करत जपली सामाजिक बांधिलकी! सकाळच्या बातमीतून प्रेरणा घेऊन जनकल्याण समितीतर्फे जळीतग्रस्त मोरे कुटुंबाला संसारोपयोगी साहित्याची मदत

आगीत राखरांगोळी झालेला संसार उभा करत जपली सामाजिक बांधिलकी! सकाळच्या बातमीतून प्रेरणा घेऊन जनकल्याण समितीतर्फे जळीतग्रस्त मोरे कुटुंबाला संसारोपयोगी साहित्याची मदत
Published on: 
पान-३ अँकर कृपया आवश्यक फोटो- 27518 चांदगाव : आगीत संसार उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला संसारोपयोगी साहित्याची मदत करताना जनकल्याण सेवा समितीचे पदाधिकारी. जळीतग्रस्त मोरे कुटुंबाला संसारोपयोगी साहित्यवाटप जनकल्याण समितीने जपली सामाजिक बांधिलकी सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १५ : तालुक्यातील चांदगाव येथील मजूर प्रतीक मोरे यांच्या झोपडीला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागून संपूर्ण संसार खाक झाला होता. या घटनेची माहिती मिळताच जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायणमामा शिंदे यांनी मित्रांच्या सहकार्याने या कुटुंबाला संसारोपयोगी साहित्य मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली. ‘सकाळ’मधून मदतीचे आवाहन करण्यात आल्यानंतर माहिती मिळताच नारायणमामा शिंदे व किशोर कुमावत यांनी मोरे वस्तीवर जाऊन जळीतग्रस्त मोरे कुटुंबाची भेट घेतली. आगीमुळे झालेली परिस्थिती पाहून कुटुंबीयांचे सांत्वन केले. दुसऱ्याच दिवशी जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायणमामा शिंदे व नीलिमा शिंदे यांनी मोरे कुटुंबाला संसारोपयोगी साहित्य दिले. समितीचे उपाध्यक्ष किशोर कुमावत यांनी महिनाभर पुरेल एवढा किराणा व कपड्यांची मदत केली. स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भोलानाथ लोणारी, सचिव राजेंद्र वडे, नारायण रायजादे, जनकल्याण सेवा समितीचे सूरज मलकरवा, शशिकांत मालपुरे, स्वप्नील शिंदे, गोविंदा शिंदे व गायत्री चौरे यांनी रोख मदत केली. सुदैवाने मोरे कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचले; मात्र त्यांचे संपूर्ण खाक झाले. दिवाळीसाठी साठवून ठेवलेले अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी भांडी अशा सर्व वस्तू भस्मसात झाल्या. पुन्हा संसार कसा उभा करायचा, असा मोठा प्रश्न या कुटुंबासमोर होता. अशा कठीणप्रसंगी येथील जनकल्याण सेवा समिती व श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने मदतीचा हात दिला. नारायण शिंदे, किशोर कुमावत, सूरज मलकरवा, राजेंद्र वडे, नारायण रायजादे, शशिकांत मालपुरे, शिवाजी लोणारी व सचिन वखारे यांच्या मदतीमुळे मोरे कुटुंबाला मोठा आधार मिळाला. जनकल्याण सेवा समितीने केलेल्या या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ........... कोट मोरे कुटुंबाचा संपूर्ण संसार आगीत उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी शक्य ते सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. समाजातील गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहून, त्यांना नव्याने जगण्याचे बळ देण्यासाठी आम्ही विविध मार्गाने प्रयत्न करतो. -नारायणमामा शिंदे, अध्यक्ष, जनकल्याण सेवा समिती, येवला