ॲंकर
शहर-जिल्हा टुडे पान तीनसाठी
-----
NSK26H35062
कुऱ्हे पानाचे (ता.भुसावळ) : जिल्हा परिषदेच्या शाळेत रविवारी स्वच्छता करताना ग्रामस्थ.
-----------
शाळेच्या अंगणात झाडू फिरला अन् जबाबदारीचा धडा गिरवला!
-------
कुऱ्हे पानाचे येथे ग्रामस्थांनी स्वच्छतेतून दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : हातात झाडू, मनात शाळेविषयीचा जिव्हाळा व प्रत्येकाच्या कृतीतून सामाजिक बांधिलकीचा संदेश कुऱ्हे (पानाचे) येथील ग्रामस्थांनी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या अंगणात रविवारी (ता.१५) राबविलेल्या स्वच्छता अभियानातून दिला. ग्रामस्थांनी दीड महिन्यापासून हा उपक्रम सुरू करून दर रविवारी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत शाळा व गावपरिसराची स्वच्छता करीत आहेत. लोकसहभागातून गावाने स्वच्छतेसह सामूहिक जबाबदारीचा आदर्श निर्माण केला आहे.
या अभियानात सहभागी झालेले कविवर्य शांतिसूत पी. टी. पाटील यांनी ‘जिल्हा परिषदेची शाळा माझी आहे आणि तिची साफसफाई मीच करणार!’ असा स्वाभिमानी संदेश दिला. शाळा ही केवळ शासनाची किंवा शिक्षकांची जबाबदारी नसून, संपूर्ण गावाची अमूल्य संपत्ती आहे. ज्या शाळेत आपल्या मुलांचे भविष्य घडते, त्या शाळेची काळजी घेण्यासाठी दुसऱ्याची वाट का पाहायची? असा विचार व्यक्त करीत त्यांनी ग्रामस्थांच्या या सातत्यपूर्ण उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुक
या अभियानाची दखल घेत भुसावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी दूरध्वनीद्वारे सहभागी सदस्यांशी संवाद साधला. शाळेच्या स्वच्छतेसाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करीत सर्वांचे अभिनंदन केले.
मोहिमेत यांनी घेतला सहभाग
या श्रमदान मोहिमेत मुख्याध्यापिका वनिता सोनवणे, शालिनी चौधरी, संतोष तायडे, शारदा मसाने, परदेशी, संतोष चौधरी, अरविंद बावस्कर, योगेश पाटील, श्रीकांत बरकले, प्रमोद उंबरकर, विजय उंबरकर, मधुकर पाटील, कालिदास कळस्कर, गणेश शिंदे, चेतन सपकाळे, सिद्धार्थ पारधी, सिद्धांत बैलम, सुनील जैन, प्रीतम सपकाळे, महेंद्र पाटील, किरण शिंदे, कौतिक बारी, किरण बरकले, रमाकांत रोनखेडे, नीलेश डांबरे, अमोल पाटील, डॉ. टी. टी. बारी, अजय पाटील, मोहन पाटील, स्वप्निल पाटील, प्रमोद बारी, लीलाधर पाटील, किशोर शिंदे, किशोर रोनखेडे, बापू नागपुरे आदी ग्रामस्थांनी सहभाग घेतला.