फोटो : NSK26H34356
डनेल : ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करताना डॉक्टरांचे पथक.
----------------
जीवनशाळांमधील आरोग्य शिबिरात
विद्यार्थ्यांसह नागरीकांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ३ : नर्मदा नवनिर्माण अभियान संचलित मणिबेली, डनेल येथील जीवनशाळांमध्ये आरोग्य शिबीर घेण्यात आले. या वेळी विद्यार्थी व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
पुणे येथील मायमर हॉस्पिटलचे डॉ. दर्पण महेशगौरी, डॉ. मिलिंद कांजाळकर, डॉ. अभिमन्यू, डॉ. प्रिया करमानी, डॉ. रुपाली महेशगौरी व डॉ. गायत्री, डॉ. राहुल काशीदे, धनश्री देसाई, डॉ. गौरी भोये, डॉ. ओम थोरात, डॉ. श्रुती पाटील, डॉ. प्रतीक रसाळ, धडगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. संतोष परमार, करुणानिधी संस्थेचे प्रतिनिधी नितीन सावंत, दशरथ शिंदे, सचिन चिखले यांनी डनेल व मणिबेलीच्या अतिदुर्गम भागात जाऊन सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. डोळे तपासून चष्मे वाटप करण्यात आले. एक्स- रे, दमा रुग्णांची पीएफटी तपासणी करण्यात आली. डॉक्टरांची टीम पिंपळखुटा ते जांगठी या खडतर रस्त्यावरून प्रवास करीत मणिबेली शाळेत पोहोचली. तेथून बोटीने व बोट ॲम्ब्युलन्सने डनेल पोहोचले. तेथे आरोग्य तपासणी करून गोळ्या, औषधांचे वाटप करण्यात आले. रात्री जीवन शाळेतच मुक्काम करण्यात आला. दुसऱ्या दिवशी बोटीने मणिबेली पोहोचून विद्यार्थी गावकऱ्यांची तपासणी व औषधोपचार झाले. या आरोग्य तपासणीचा डनेल, मुखडी, बामणी, चिमलखेडी, धनखेडी, जांगठी मणिबेली गावातील रूग्णांनी लाभ घेतला.
शिबीर यशस्वी करण्यासाठी नर्मदा नवनिर्माण अभियानाचे लतिका राजपूत, चेतन साळवे, सियाराम पाडवी, विरसिंग पावरा, जीवन शाळेचे शिक्षक राजेश वसावे, रिमा पाडवी, रवी पाडवी, शिरीष कुमार पाडवी, प्रेमसिंग वसावे, विरसिंग पावरा व गावकऱ्यांनी सहकार्य केले.