NSK26H32183
जळगाव : कुसुंबा येथील अंगणवाडीसाठी पंखे भेट देताना ग्रामस्थ. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविका.
–––
अंगणवाड्यांना लोकसहभागातून मदत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : पोषण माह समुदाय सहभाग, स्वामित्व आणि उत्तरदायित्व थीम अंतर्गत अंगणवाड्यांसाठी लोकसहभागातून मदत देण्यात आली. जळगाव तालुक्यातील वावडदा विभागांतर्गत असलेल्या काही अंगणवाड्यांना लोकसहभागातून वस्तू भेट देण्यात आल्या.
यात विटनेर ग्रामपंचायतकडून सरपंच यांच्या वतीने चार अंगणवाड्यांना पंखे भेट देण्यात आले. तर उपसरपंच यांच्या वतीने अंगणवाडीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन प्रतिमा भेट देण्यात आल्या. सदस्य गोकुळ राठोड यांनी अंगणवाडीच्या पायऱ्या दुरुस्ती करून दिल्या. तसेच मुलांसाठी राजगिऱ्याचे पौष्टिक लाडू वाटप करण्यात आले. या व्यतिरिक्त वसंतवाडी अंगणवाडी येथे प्रवीण पाटील यांचेकडून धान्य ठेवण्यासाठी कोठ्या, तसेच वराड येथे नवीन अंगणवाडी इमारतीसाठी घड्याळ सैनिक संदीप सुरळकर यांनी दिले. पर्यवेक्षिका अर्चना धामोरे तसेच सर्व अंगणवाडी सेविकांच्यावतीने भेट वस्तू देण्यात आले.
याशिवाय कंडारी अंगणवाडीत दानपेटीत लोकसहभागातून रोख रक्कम प्राप्त झाली. तसेच उमाळे येथे कोमल धनगर यांच्याकडून रोख रक्कम व छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो भेट. इंदूबाई ससाणे यांच्याकडून मुलांना खेळण्यासाठी चेंड भेट दिले. धानवड येथेही ग्रामस्थांकडून मदत देण्यात आली. कुसुंबा येथे प्रमोद घुगे आणि मनोज पाटील यांनी अंगणवाडी केंद्रासाठी नऊ पंखे तसेच नरेंद्र पाटील यांनी चटई भेट दिली.