ॲंकर
NSK26H34972
पाळधी खुर्द : नागरिकांना पाण्याचे जारचे वाटप करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी.
---------
ढोलताशांचा खर्च टाळून ४०० कुटुंबांना जार वाटप
पाळधी खुर्द येथे त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ, जीपीएस मित्र परिवाराचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : उत्सवाचा खरा आनंद केवळ जल्लोषात नसून समाजाच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून जाण्यात आहे. याच भावनेतून पाळधी खुर्द येथील त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ व जीपीएस मित्र परिवाराने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्तुत्य उपक्रम राबविला. दुर्गोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे, बँड व ढोलताशांवर होणारा खर्च टाळून त्या रकमेतून प्रभाग क्रमांक ४ मधील ४०० कुटुंबांना प्रत्येकी एक पाण्याचा जार वाटप करण्यात आला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम पार पडला.
पाळधी खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य सुधाकर महाजन यांच्या पुढाकाराने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिनगर येथील त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ व जीपीएस मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
पाळधीचे सरपंच शरद कोळी, उपसरपंच दिलीप पाटील, सदस्य अनिल कासट, सुधाकर महाजन, डिगू माळी, चंदू माळी, गणेश माळी, नाना फुलपगार, सुभाष महाजन, पंकज कोळी यांच्यासह त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ व जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
हीच खरी सामाजिक बांधिलकी : पालकमंत्री
पालकमंत्री पाटील म्हणाले की, दुष्काळाच्या काळात नागरिकांची गरज ओळखून उत्सवाचा खर्च समाजहितासाठी वापरणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ व जीपीएस मित्र परिवाराने समाजापुढे आदर्श निर्माण केला असून, इतर मंडळांनीही अशा विधायक उपक्रमांचा आदर्श घ्यावा.