Fraud Crime : कंपनी मालकानेच केली कामगारांची कोटीची फसवणूक | Latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud crime news

Fraud Crime : कंपनी मालकानेच केली कामगारांची कोटीची फसवणूक

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या मालकाने कंपनीतील कामगारांच्या पगारातून कपात केलेली सोसायटीच्या कर्जाचे हप्ते न करता सुमारे १ कोटी ३ लाख ९० हजार ९८७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्‍याम चंद्रकांत केळुसकर (६८, रा. रामानंद हाईटस्‌, साधू वासवानी रोड, कुलकर्णी कॉलनी, सातपूर) असे संशयित कंपनी मालकाचे नाव आहे. (company owner cheated workers of worth crores nashik Fraud Crime Latest marathi news)

हेही वाचा: Crime Update : ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संतोष अशोक कदम (रा. भगीरथ संकुल, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित श्‍याम केळुस्कर यांची सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये प्रीमिअम टूल्स ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये असलेल्या कामगारांची सोसायटी असून, यातून त्यांनी कर्ज घेतलेले आहे.

या सोसायटीच्या मागणीनुसार शेअर्स व कर्जाचे व्याजासह हप्ते या कामगारांच्या वेतनातून कपात होतात. मात्र, सप्टेंबर २०१४ पासून कंपनी मालक केळुस्कर यांनी कामगारांच्या वेतनातून कपात केलेली सोसायटीच्या कर्जाची रक्कम प्रीमिअम टूल्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीकडे जमा करणे आवश्‍यक होते.

परंतु कंपनी मालक केळुस्कर यांनी सप्टेंबर २०१४ पासून कामगारांच्या वेतनातील कपात केलेली १ कोटी ३ लाख ९० हजार ९८७ रुपयांची रक्कम न भरता सदरची रक्कमेचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला. याप्रकरणी सातपूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक वाघ हे करीत आहेत.

हेही वाचा: Nashik : चला गं... मंगळागौरीचा करूयात जागर !

Web Title: Company Owner Cheated Workers Of Worth Crores Nashik Fraud Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..