दिवाळीत मतदारांना शुभेच्छा देण्यासाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा

political news
political newsesakal

सटाणा (जि. नाशिक) : पालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात इच्छुकांनी दिवाळी सणाचे निमित्त साधून आपल्या उमेदवारीची चाहूल दिली आहे. इच्छुकांमध्ये आपल्या प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत दिवाळीपूर्वी पोहोचण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. दररोज शुभेच्छापत्र, दिवाळी भेट कार्ड व रंगीत पणत्यांचा संच यांचा जणू काही पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.

बॅनर लावण्याचीही स्पर्धा

काही संभाव्य उमेदवार आपल्या समर्थकांसह थेट घराघरात जाऊन आपले शुभेच्छापत्र व निवडणुकीतील वचननामा आजच मतदारांसमोर मांडत आहेत. फराळाचे पदार्थ व आपण करणार असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा असलेले पत्रक प्रत्येक मतदारापर्यंत पोहचवत आहेत. एका अतिउत्साही इच्छुकाने तर त्याच्या प्रभागातील पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा जेथे मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली होती, ती सर्व तोडून जेसीबीने त्या भूखंडाचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू केल्याचे पाहून त्याच्या स्पर्धक उमेदवारांच्या भुवया उंचावल्या आहेत. या आगळ्यावेगळ्या कामाची शहरात एकच चर्चा रंगली आहे. प्रत्येक चौकांमध्ये इच्छुकांनी आपल्या फोटोसह मोठमोठे बॅनर लावले आहेत. हे बॅनर एकमेकांजवळ लावण्याचीही स्पर्धा सुरू आहे. अजून प्रत्यक्ष निवडणूक तीन-चार महिने पुढे असली तरी संभाव्य उमेदवारांच्या या चढाओढीकडे मतदार मात्र एका वेगळ्याच नजरेने बघत आहेत.

political news
दीपोत्सवात पावसाची शक्यता; द्राक्ष व कांदा उत्पादकांत चिंता

नगराध्यक्ष सुनील मोरे व विद्यमान नगरसेवकांनी ‘सटाणा शहर, पुनद धरण पाणीपुरवठा योजना एक संघर्ष गाथा’ या नावाची एक पुस्तिका प्रकाशित करून पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा मांडला आहे. या लेखाजोख्यासोबत मिठाईचे एक बॉक्स घराघरात वाटले जात आहे. स्वतः नगराध्यक्ष व त्या प्रभागातील नगरसेवकांचे समर्थक संघर्षगाथा वाटताना घोळक्याने फिरत असल्याने प्रचाराचे वातावरण आजच तयार झाले आहे.

नगराध्यक्ष पदासाठी चुर्रस...

एकूणच दिवाळीच्या मुहूर्तावर संभाव्य उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा बिगुल वाजवला आहे. असे असले तरी गेल्यावेळची निवडणूक आणि आत्ताची नगराध्यक्षपदाची निवडणूक यात मोठा बदल झाला आहे. या वेळी थेट नगराध्यक्षऐवजी प्रभागनिहाय नगरसेवक निवडून त्यातून नगराध्यक्ष निवडणार असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुर्रस राहील व नगराध्यक्ष पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते, याबाबत कमालीची उत्सूकता पसरली आहे. गेल्या निवडणुकीत २१ नगरसेवक संख्या होती. आता मात्र नगरसेवकांच्या संख्येत वाढ होऊन २४ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे आता या चुरशीच्या लढतींचे वर्णन आजपासूनच रोचकपणे केले जात आहे.

political news
''एक हाथ से दो, एक हाथ से लो''; पाहा, चतुर माकडाचा भलताच स्मार्टपणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com