
Navratrotsav 2022 : NMC महिला कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धा; 105 महिलांचा सहभाग
नाशिक : महापालिकेकडून नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये विविध विभागातील १०५ महिलांनी सहभाग नोंदविला. मुख्यालय राजीव गांधी भवन येथे महिला कर्मचाऱ्यांसाठी आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम, प्रभारी अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे आणि उपायुक्त डॉ. दिलीप मेणकर यांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडल्या. (Competition for NMC Women Employees on navratri 2022 Nashik Latest Marathi News)
मनपा समाजकल्याण विभागाने स्पर्धेचे आयोजन केले होते. मनपाचे सहा विभाग मिळून एकूण १०५ महिला कर्मचाऱ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. चमचा लिंबू स्पर्धेत छाया चारोस्कर (घनकचरा व्यवस्थापन) यांचा प्रथम, जया बागडी (वैद्यकीय) यांचा द्वितीय आणि कला डगळे (छपाई) यांचा तृतीय क्रमांक आला.
संगीत खुर्ची स्पर्धेत सविता येवले (ट्रेझरी) प्रथम, हेमांगी जाधव (महिला बालकल्याण) द्वितीय आणि ज्योत्सना राजपूत (पंचवटी ट्रेझरी) यांचा तृतीय क्रमांक आला. रांगोळी स्पर्धेत भावना चंदू कुंवर (विधी) प्रथम, सविता दशपुत्रे- येवले (ट्रेझरी) द्वितीय आणि मोनाली मोरे (नगरनियोजन) यांचा तृतीय क्रमांक आला.
हेही वाचा: आदिमाया- आदिशक्ती : मधली होळी येथील रेणुकामाता
सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अजिता सांळुखे, डॉ. कल्पना कुटे, उपलेखाधिकारी प्रतिभा मोरे यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. समाजकल्याण आणि क्रीडा विभागातील महेश आटवणे, आनंद भालेराव, राजश्री जैन, आरती मारू, रमेश पागे यांनी स्पर्धा यशस्वितेसाठी कामकाज पाहिले.
पुरुष कर्मचाऱ्यांच्याही स्पर्धा होणार
मनपातील पुरुष कर्मचाऱ्यांच्याही स्पर्धा लवकरच होणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त डॉ. दिलीप मेणकर यांनी दिली आहे. प्रथम विजेत्याला १५०१ रुपये आणि ट्रॉफी, द्वितीयेला १००१ रुपये आणि ट्रॉफी, तिसरा विजेत्याला ७०१ रुपये आणि ट्रॉफी पारितोषिके म्हणून दिली जाणार आहे.
हेही वाचा: आज ना उद्या घोलप आमच्या सोबत येतील : प्रविण तिदमे