Dada Bhuse News: दादा येतात, बैठका घेतात..परिस्थिती मात्र ‘जैसे थे’; शिंदे सेनेच्या मार्केटिंगचा फंडा निष्फळ

Dada Bhuse and Chhagan Bhujbal
Dada Bhuse and Chhagan Bhujbalesakal

Dada Bhuse News : शहरात डेंगीच्या उच्छादासह अतिक्रमण, आरोग्य, रस्त्यांवरील खड्डे यांसारख्या समस्यांनी तोंड वर काढले असताना, त्या समस्या सोडविण्यात राज्यातील सत्ताधारी शिंदे गट मात्र अपयशी ठरला आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनी मार्केटिंगचा फंडा वापरत विविध मुद्द्यांवर बैठका घेतल्या. परंतु सूचना देणे व अधिकाऱ्यांनी ‘येस सर’ म्हणणे या पलीकडे त्या बैठकांमधून हाती काहीच आले नाही.

पालकमंत्र्यांची प्रशासनावर छापच पडत नसल्याने छगन भुजबळ यांच्या वागण्या-बोलण्यात पालकमंत्रिपदाची जी जरब होती, ती भुसे यांच्यात अजिबात दिसत नसल्याची भावना नागरी समस्यांवर तक्रारी करणाऱ्या तक्रारदारांकडून व्यक्त केली जात आहे. (complainant complaint that dada bhuse failed to solve problems in city nashik news)

अधिकारीवर्गदेखील बैठका घेणे त्यांचे कामच आहे व ‘हो ला हो‘ म्हणणे आमचे. प्रत्यक्षात फिल्डवर काय समस्या असतात त्यांना काय माहिती, अशी भूमिका घेत असल्याने शहरात जम बसविण्यासाठीचा शिंदे सेनेचा मार्केटिंगचा फंडा निष्फळ ठरताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून नाशिक महापालिकेसंदर्भात येणाऱ्या समस्यांवर बैठका घेण्याचा धडाका लावण्यात आला आहे. या बैठका घेताना अगदी रस्त्यांवरील खड्ड्यांपासून ते गरीब घरातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी करावयाचे प्रयत्न व त्या अनुषंगाने सूचनांचा समावेश आहे. बैठका घेऊन प्रशासनावर वचक निर्माण करणे, ही पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे.

मात्र नाशिक शहरामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांना ही जबाबदारी पार पाडताना शिवसेनेच्या शिंदे गटाला मार्केटिंगदेखील करणे महत्त्वाचे वाटते. त्याला कारण म्हणजे नाशिक महापालिकेत शिवसेनेच्या जवळपास १५ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला. त्याचबरोबर भुसे यांच्यासह दोन आमदार व एक खासदारदेखील शिंदे सेनेत सहभागी आहे.

त्यामुळे नाशिक महापालिकेची आगामी निवडणूक व लोकसभा व विधानसभेत दावेदारी करण्यासाठी नाशिकचे राजकीय मैदान भुसभुशीत असल्याचे शिंदे गटाला वाटते. त्यामुळे बैठकांच्या माध्यमातून आम्ही नागरी समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे दाखवून दिले जात आहे. परंतु एकीकडे बैठका घेताना दुसरीकडे मात्र त्यातून फलनिष्पत्ती होताना दिसत नाही. दादा येतात, बैठका घेतात.. परिस्थिती मात्र ‘जैसे थे’ अशीच असते, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Dada Bhuse and Chhagan Bhujbal
Maratha Reservation : आप्पा, 40 दिवस कोठे होते? सकल मराठा समाजाचा खासदार हेमंत गोडसेंना सवाल

भुजबळांसारखा हवा दरारा

कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पायाभूत सुविधांचा सध्या उडालेला बोजवारा व भ्रष्टाचाराचे दररोज विविध प्रकरणे बाहेर पडत असताना पालकमंत्र्यांकडून हवा तसा प्रशासनावर वचक नाही. पालकमंत्र्यांचा दरारा हा भुजबळ यांच्यासारखा हवा, अशी भावना तक्रारदारांकडून व्यक्त केली जात आहे.

ठाकरे गटाकडून डॉक्युमेन्टेशन

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या बैठका व त्या बैठकांची फलनिष्पत्तीचा अहवाल तयार केला जात आहे. निवडणुकीच्या काळात आम्ही काय केले, हे सांगताना शिंदे गटाला कागदी पुराव्यातून उत्तर देण्याची ही तयारी आहे.

पालकमंत्री भुसे यांनी घेतलेल्या बैठका व कंसात परिणाम

- नाशिक महापालिका मुख्यालयात विभागप्रमुखांची बैठक घेऊन विकासकामांचा आढावा. (वेगाने कामे होण्याऐवजी कामांची गती थंडावली.)

- पावसाच्या सुरवातीला सिटी सेंटर मॉल व चोपडा लॉन्स येथे रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याच्या सूचना. (खड्ड्यांची परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक बिघडली.)

- देवळालीगाव भागात समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड व जाळपोळ केल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा. (बैठकीनंतरही शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेच, उलट ड्रग कारखाना मुंबई पोलिसांकडून उद्ध्वस्त.)

- डेंगी रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. (रुग्णांची संख्येत सातत्याने वाढ)

Dada Bhuse and Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal News : समाजासाठी मेलो तर काय बिघडलं? भुजबळ यांचे धमकी प्रकरणावरून स्पष्टीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com