esakal | टास्‍क फोर्समध्ये सर्वसमावेशक निर्णय- जिल्हाधिकारी । Collector
sakal

बोलून बातमी शोधा

टास्‍क फोर्समध्ये सर्वसमावेशक निर्णय- जिल्हाधिकारी

टास्‍क फोर्समध्ये सर्वसमावेशक निर्णय- जिल्हाधिकारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टास्‍क फोर्समध्ये सर्वसमावेशक निर्णय- जिल्हाधिकारी

विकास आणि पर्यावरणाची सांगड घालताना उपस्थित होणाऱ्या प्रश्नांसोबत टास्क फोर्स मध्ये सर्वसमावेशक निर्णय होतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

Comprehensive decision in Task Force - Collector srs9

हेही वाचा: कृषी उत्पन्न बाजार समितीला पुन्हा मुदतवाढ

खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल, पुरातत्व विभागाचे राकेश शेंडे, पर्यावरणप्रेमी अश्विनी भट, दिपक जाधव, दत्तू ढगे, मनोज साठे, वैभव देशमुख, राम खुर्दल, राजेश पंडित, देवचांद महाले, प्रशांत परदेशी, क्रेडाई नाशिकचे गौरव ठक्कर, खाणपट्टा धारक अभिजीत बनकर, सुदाम धात्रक , रवी महाजन आदी उपस्थित होते.

डोंगराऐवजी समतलावर उत्खननाचा आग्रह

ढगे यांनी सारुळ परिसरातील जैवविविधतेबाबत अहवाल सादर केला. नारेडकोचे प्रतिनिधीनी वैध परवानगी दिलेल्या ठिकाणांवरून अव्याहत पुरवठा व्हावा अशी मागणी केली. अश्विनी भट यांनी वृक्षतोडीच्या अडचणी मांडल्या. डोंगर रांगातील उत्खनना ऐवजी समतल उत्खनन करण्याच्या पर्यायांबाबत उपस्थित सदस्यांनी आग्रह धरला.

हेही वाचा: बांधावर जाऊन व्हावेत नुकसानीचे पंचनामे- अंबादास दानवे

गटनिश्चितीचा अहवाल देणार

जिल्हाधिकारी मांढरे यांनी, टास्क फोर्समध्ये पर्यावरण रक्षणासोबतच बांधकाम विकासाच्या उत्तरदायीत्वाच्या दुहेरी भुमिकेतूनही निर्णय होण्याचे आवाहान केले. जिल्हास्तरीय टास्क फोर्स अंतर्गत विविध विषयांच्या अनुषंगाने विषयांनुसार संबंधित गटातील सदस्यांनी अहवाल तयार करून अपर जिल्हाधिकारी यांना लवकरात लवकर सादर करावा, क्षेत्र निश्चितीसाठी तयार केलेल्या गटाने दोन महिन्यांच्या कालावधीत क्षेत्र निश्चित करून अहवाल सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले.

loading image
go to top