Nashik Crime: एका व्यावसायिकांचा भर न्यायालयातच गोंधळ! सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Nashik Crime : आपल्यावर अन्याय होत असून, न्याय मिळवून देण्यासाठी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करीत, शहरातील एका सराफी व्यावसायिकाने भर न्यायालयात गोंधळ घातला. एवढेच नव्हे तर त्याने धारदार वस्तूने स्वत:च्या बोटाला कापूनही घेतले.

अचानक झालेल्या या घटनेमुळे न्यायालयात गोंधळाची स्थिती झाली. सरकारवाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत व्यावसायिकाला ताब्यात घेतले. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Confusion in court due to addition of businessman case registered in Sarkarwara police Nashik Crime)

धनंजय एकनाथ लोळगे (३१, रा. मातोश्री, गायधनी लेन, सराफ बाजार, नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सराफी व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोळगे यांची सराफ बाजारात सराफी पेढी आहे.

परंतु, त्यांचे आजू-बाजूच्यांशी काहीतरी कारणातून वाद आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायालयात १५३/३ नुसार संबंधितांविरोधात अर्ज दाखल केलेला आहे. याच अर्जाच्या नियमित कारवाईसाठी शुक्रवारी(ता. ७) ते सकाळी जिल्हा न्यायालयात आले होते.

त्यावेळी त्यांनी ‘माझ्या केससाठी अॅड. अजय मिसर हेच वकील हवेत, मला न्याय द्या, वेळकाढूपणा बस्स झाला, संबंधितांवर कारवाई करा असे म्हणत भर न्यायालयात एकच गोंधळ घातला. यावेळी न्यायालयात असलेल्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी धारदार वस्तूने स्वत:चे बोटांवर मारुन दुखापत करून घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Sambhajinagar Crime : वाहनाला हुलकावणी दिल्याच्या कारणावरून वाद; हल्ल्यात जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

अचानक घडलेल्या या घटनेमुळे न्यायालयात भिती पसरली. घटनेची माहिती कळताच सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. लोळगे यांना ताब्यात घेत त्यांन उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात सरकारी कामात अडळथळा आणणे, स्वत:ला दुखापत करुन घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्याला सोडून दिले आहे.

Crime News
Sambhajinagar Crime : वाहनाला हुलकावणी दिल्याच्या कारणावरून वाद; हल्ल्यात जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.