
Nasihk News : कायम गजबजलेला चौक म्हणून ओळख असलेल्या काट्या मारुती चौकात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली. मात्र, चौकाचे दोन टोकांचे अंतर खूप असल्याने तसेच या सिग्नलवर अजूनही पांढरे पट्टे मारलेले नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे.
सिग्नल बंद असतानाही वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न होत असताना पट्टे नसल्याने पोलिसांनाही अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यास अडचणी येत आहेत. (Confusion of motorists due to lack of white stripes Nashik News)
महामार्गाकडून निमाणीकडे, निमाणीकडून महामार्गाकडे, हिरावाडीकडून गणेशवाडीकडे अशा चार वेगवेगळ्या आणि वळणाच्या मार्गावरील काट्या मारुती चौक वाहनचालकांच्या दृष्टीने कायमच्या कोंडीचा चौक म्हणून ओळखला जात आहे.
या चौकातील या अगोदर बसविलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी अनेकदा तांत्रिक अडचणी आल्या. अखेर जुनी यंत्रणा पूर्णपणे काढून नव्याने यंत्रणा बसविण्यात आली. सिग्नलचे खांब, वाहने थांबविण्याच्या जागा, चौकाची दोन टोके यांचे अंतर जास्त असल्यामुळे सुरवातीला वाहने सिग्नल बंद असतानाही पुढे नेण्याचे प्रकार घडत होते.
निमाणीकडे जाणारी आणि निमाणीकडून येणारी वाहने यांची संख्या मोठी असल्याने सिग्नल बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबवर रांगा लागतात. गणेशवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याकडील तसेच हिरावाडीकडे जाणाऱ्या रस्त्याकडील असलेला सिग्नल अनेकदा चालकांच्या लक्षात येत नाही.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
विशेषतः या चौकात पहिल्यांदा आलेल्या चालकाचा गोंधळ उडतो. त्यामुळे अनेकदा सिग्नल तोडण्याचे प्रकार घडतात. सिग्नल बंद असताना वाहने कुठे थांबवायची यासाठी पांढरे पट्टे असणे गरजेचे आहे. या चौकात पांढरे पट्टेच नसल्याने लाल सिग्नल असताना वाहने चौकात पुढे नेण्याचा प्रयत्न होतो.
त्यामुळे वळसा घेऊन दुसऱ्या मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना आडवे असलेल्या वाहनांची अडचण निर्माण होऊन कोंडी होते. अशाप्रकारे वाहने पुढे नेली असताना पांढरे पट्टे नसल्याने नियमांचे उल्लंघन केले म्हणून वाहनचालकांवर पोलिसांना कारवाई करता येत नाही.
महामार्गासह इतर मार्गांवर ठिकठिकाणी पांढरे पट्टे मारण्यात आलेले आहे. मात्र, या सिग्नलवर पांढरे पट्टे नसल्याने वाहने बेशिस्तीने नेली जात असल्याचे प्रकार घडत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.