प्रभागातील समस्यांबाबत काँग्रेसचे महापौरांना निवेदन

प्रभागातील समस्यांबाबत काँग्रेसचे महापौरांना निवेदन
Published on: 
NSK26H34090 जळगाव : प्रभागातील समस्यांबाबत महापौर दीपमाला काळे यांना काँग्रेसतर्फे निवेदन देताना शहर जिल्हाध्यक्ष जमील शेख, ब्लॉक अध्यक्ष राहुल भालेराव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते. ... प्रभागातील समस्यांबाबत काँग्रेसचे महापौरांना निवेदन पाच प्रमुख मागण्यांसह शहरातील बंद पथदिव्यांचा प्रश्नही मांडला सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : शहरातील प्रभाग १५ मधील विविध नागरी समस्या सोडविण्यासह बंद पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महापौर दीपमाला काळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पाच प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी महापौरांनी संबंधित प्रभागात दौरा करून निवेदनातील मागण्यांची पाहणी व दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच शहरातील अनेक भागांतील बंद पथदिव्यांचा प्रश्नही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडला. या समस्येवर लवकरात लवकर पाठपुरावा करून पथदिव्यांची व्यवस्था सुरळीत करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. निवेदन देतेवेळी शहर जिल्हाध्यक्ष जमील शेख, ब्लॉक अध्यक्ष राहुल भालेराव, अनंत परिहार, विशाल पवार, चंद्रकांत पाटील, सखाराम मोरे, मालोजी पाटील, देवीदास ठाकरे, विजय वाणी, अरुणाताई, अनिता कोळी, विनोद भोपे, नाना भोई, हेमंत खाचणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.