फोटो -16053
मालेगाव : येथे झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना ॲड. संदीप पाटील, रमेश कहांडोळे, भरत टाकेकर, शरद खैरनार आदी.
---
काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची
विविध विषयांबाबत मालेगावला बैठक
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. ७ : नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे उत्तर व दक्षिण विभागाच्या सर्व तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर झाली. जिल्हा काँग्रेसचे प्रभारी व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. संदीप पाटील अध्यक्षस्थानी हाेते. मालेगाव तालुकाध्यक्ष शरद खैरनार यांनी बैठकीचे नियोजन केले.
बैठकीत नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणी व वाढीसाठी सखोल चर्चा करण्यात आली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुकाध्यक्षांकडून, तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक विधानसभानिहाय माहिती जाणून घेण्यात आली. संपूर्ण नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यात यावी, असा ठराव मांडण्यात आला. मुंबई इथे आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये आला असता, प्रदेश काँग्रेस कमिटी आवारात विद्यार्थ्यांवर जो हल्ला करण्यात आला त्याचा निषेध करण्यात आला. बैठकीस नाशिक जिल्हा उत्तर अध्यक्ष रमेश कहांडोळे, नाशिक जिल्हा दक्षिण अध्यक्ष भरत टाकेकर, मालेगाव तालुकाध्यक्ष शरद खैरनार, सेवादल प्रदेश उपाध्यक्ष अजबराव पाटील, प्रदेश सरचिटणीस दरबारसिग गिरोसे यांनी मनोगत व्यक्त केले. कळवणचे तालुकाध्यक्ष के. के. गांगुर्डे, देवळ्याचे अध्यक्ष दिनकर निकम, नांदगावचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे, येवला काँग्रेसचे अध्यक्ष समीर देशमुख, निफाड काँग्रेसचे अध्यक्ष साहेबराव डोमसे, सिन्नर काँग्रेसचे अध्यक्ष गोरख सांगळे, त्र्यंबक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश कोठुळे, मनमाड काँग्रेसचे अध्यक्ष नदीम शेख, दिलीप पाटील, मिलिंद चिते, मच्छिंद्र जाधव, कैलास पाटील, प्रसाद गोलाईत आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.