नाशिक: भरपावसात गळ्यात कांद्याची माळ परिधान करत काँग्रेसच्या नेत्यांनी ’नाफेड’च्या कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन केले. कांद्याच्या खरेदीतील घोटाळ्याची चौकशी करा, कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव द्या आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याची मागणी करत आंदोलकांनी द्वारका परिसर दणाणून सोडला. निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांना कांद्याची माळ घालत या नेत्यांनी आपला निषेध नोंदवला.