वोट चोरी बंद करा,एसआयआर प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे! ज्ञानेश कुमाराच्या राजीनाम्यासाठी येवल्यात काँग्रेसचे निदर्शने,केंद्र सरकार,निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी

वोट चोरी बंद करा,एसआयआर प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे! ज्ञानेश कुमाराच्या राजीनाम्यासाठी येवल्यात काँग्रेसचे निदर्शने,केंद्र सरकार,निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी
Published on: 
पान एक ------------------ 27404 येवला : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करतांना काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते. ‘वोट चोरी बंद करा, एसआयआर प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे’ ज्ञानेश कुमाराच्या राजीनाम्यासाठी येवल्यात काँग्रेसचे निदर्शने सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ३ : मतदार यादीतील कथित अनियमितता,मतदारांची नावे मनमानी पद्धतीने वगळल्याचा आरोप आणि एसआयआर प्रक्रियेच्या विरोधात तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विंचूर चौफुली येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि देशात निष्पक्ष निवडणुका घेण्यात याव्यात आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कथित मनमानी कारभाराचा निषेध केला. यावेळी ज्ञानेश कुमार राजीनामा द्या,वोट चोर गद्दी छोड,एसआयआर प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे, वोट बचाओ, देश बचाओ, वोट चोरी बंद करा,माझे मत, माझा अधिकार आणि निष्पक्ष निवडणुका हा देशाचा अधिकार अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. मतदार यादीत मनमानी पद्धतीने नावे वगळून नागरिकांचा मतदानाचा वैधानिक अधिकार हिरावून घेतला जात असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. मतदार यादीतील अनियमिततेची सखोल चौकशी करून यासाठी जबाबदार असणाऱ्यांची निश्चिती करावी, निवडणूक आयोगाच्या कामकाजातील अनियमिततेसंदर्भात काँग्रेस पक्षाकडे अनेक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करण्यात यावे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. आंदोलनात बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, बळीराम शिंदे, तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष रेहान पठाण, राजेंद्र पगारे, भगवान चित्ते, बाबासाहेब शिंदे, सुखदेव मढवई, युवक काँग्रेस शहराध्यक्ष ॲड. नाना शिंदे, अरमान शेख, ॲड. अमोल पगारे, अशोक मोहारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.