NSK26H33702
जळगाव : जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत बोलताना महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप. शेजारी जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, उपाध्यक्ष ॲड. संदीप पाटील आदी.
-----------
अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी एकत्र या
जळगावला काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्र सहप्रभारी संदीप यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २७ : देशात युवकांना रोजगार नाही, महिला सुरक्षित नाहीत, मतांची चोरी होत आहे आणि विद्यार्थ्यांची आंदोलने क्रूरपणे चिरडली जात आहेत. या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे आणि १ नोव्हेंबरला दिल्लीत होणाऱ्या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र सहप्रभारी बी. एम. संदीप यांनी केले.
जिल्हा व शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, प्रदेश सरचिटणीस मुक्ती हरून, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सलीम पटेल, माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण महाजन, प्रदेश उपाध्यक्ष अशोक खलाणे, ज्योत्स्ना विसपुते, श्रीधर चौधरी, शहराध्यक्ष जमील शेख, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार, सरचिटणीस विजयकुमार कोसोदे आदी उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस बाबा देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. विजय वाणी यांनी आभार मानले.