नाशिक- ‘स्मार्टसिटी’ कंपनीने केलेल्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे. याबद्दल काँग्रेसकडून तज्ज्ञांची तांत्रिक कमिटी स्थापन करून त्या कामांची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. कायदेशीर सल्ला घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी माजी गटनेते शाहू खैरे, सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर उपस्थित होते.