

NCP Sharadchandra Pawar Faction Opposes Constituency Delimitation Bill
esakal
सटाणा : मतदारसंघ फेररचना घटनादुरुस्ती विधेयकाच्या नावाखाली लोकसभेसह विधानसभेतील जागांची संख्या वाढवून देशातील लहान-मोठ्या प्रादेशिक पक्षांचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा आणि विरोधकांचे प्रतिनिधित्व मर्यादित करून सत्ताधारी भाजपला राजकीय लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे लोकशाही मूल्यांशी आणि राज्यघटनेशी प्रतारणा ठरेल. लोकशाही टिकविण्यासाठी या विधेयकातील तरतुदींना जनतेसह सर्वच राजकीय पक्षांनी विरोध करावा असे आवाहन माजी आमदार संजय चव्हाण यांनी केले.