भारतीय संविधान वाचाल तर देश वाचेल..! अमोल फरताळे : राष्ट्र ग्रंथ वाचन-संवाद उपक्रम,वर्षावास उत्साहात सांगता

भारतीय संविधान वाचाल तर देश वाचेल..! अमोल फरताळे : राष्ट्र ग्रंथ वाचन-संवाद उपक्रम,वर्षावास उत्साहात सांगता
Published on: 
पान चार -------------- 27375 येवला : राष्ट्र ग्रंथ संविधान वाचन-संवाद व वर्षावास सांगता प्रसंगी उपस्थित अमोल फरताळे, शरद शेजवळ आदी. भारतीय संविधान वाचाल तर देश वाचेल अमोल फरताळे : राष्ट्र ग्रंथ वाचन-संवाद; वर्षावास सांगता सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ३१ : जगातील सर्वच धर्मग्रंथ, शासन व्यवस्था, राज्यघटना यांचा सखोल अभ्यास करून भारताचे संविधान निर्माण झाले असून भारतीयांनी आपली नैतिक कर्तव्य म्हणून भारतीय संविधान तथा राज्यघटना वाचावी, संविधान वाचाल तर देश वाचेल मत येथील ध्येयशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल फरताळे यांनी व्यक्त केले. येथील डॉ. आंबेडकर स्मारक समिती संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय लोक कवी वामनदादा कर्डक मुक्ती भूमी अभ्यासिका यांच्या वतीने वर्षावासात राष्ट्र ग्रंथ संविधान वाचन-संवाद उपक्रम व वर्षावास सांगता कार्यक्रमात श्री. फरताळे बोलत होते. अध्यक्षस्थानी सुरेश खळे होते. मार्गदर्शक वसंतराव झांबरे, कार्याध्यक्ष पांडुरंग शेलार, मुक्तीभूमी वाचनालयाचे संस्थापक शरद शेजवळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. सत्य, शांती, अहिंसा, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकता-एकात्मता, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावादी मूल्यांची रुजवणूक ही जगाला तथागत बुद्धाने दिलेली बहुमोल देणगी असून विद्या, विनय व शील आदर्श जीवनाचा मार्ग असल्याचे यावेळी ध्येयशक्ती फाउंडेशनचे कार्याध्यक्ष पांडुरंग शेलार यांनी केले. सलग तीन महिने चाललेल्या संविधान वाचन संवाद उपक्रमाचे प्रशिक्षक गजानन सुर्यकरसर,विशाल गरुड यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक शैलेंद्र वाघ, सूत्रसंचालन शरद शेजवळ यांनी केले तर आभार अधीक्षक बी.डी खैरनार यांनी मानले. याप्रसंगी समर्थ गरुड, सुमीत गरुड, सार्थक पगारे, समीर धामले, सिद्धार्थ गरुड, तेजस गोरे, प्रिन्स भालेराव, रोहित वाघ, करण ठाकरे, कुणाल वाघ, गणेश बरडे, नीलेश अहिरे, सार्थक गोरे, आशिष पगारे, संकेत पगारे, गौरव गायकवाड, ओम ढांबले, कृष्णा सोनवणे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.