धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 33352
धुळे : मागासवर्गीय अल्पसंख्याक कर्मचारी संघटनेतर्फे झालेल्या परिसंवादात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. सुधाकर जाधव. शेजारी मान्यवर.
--
संविधानिक मूल्यांमुळेच समाजात परिवर्तन घडेल
--
प्रा. डॉ. सुधाकर जाधव : धुळ्यात विद्यावर्धिनी महाविद्यालयात परिसंवाद
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २३ : भारतीय समाजात संविधानिक मूल्ये रुजल्यावरच खऱ्या अर्थाने समाजव्यवस्था परिवर्तन घडवून येईल.दिवसेंदिवस समाजातील कमी होणारी संवेदनशीलता आणि वस्तुनिष्ठता चिंताजनक असल्याचे मत प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी व्यक्त केले.
मागासवर्गीय अल्पसंख्याक कर्मचारी संघटनेतर्फे विद्यावर्धिनी महाविद्यालयात समाजव्यवस्था परिवर्तनात कर्मचारी, महिला व विद्यार्थी यांची भूमिका या विषयावर परिसंवाद झाला, याप्रसंगी प्रा. डॉ. जाधव बोलत होते. मोराणे (ता. धुळे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. प्रिती वहाने यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रा. विलास चव्हाण, नरेंद्र खैरनार, जिल्हाध्यक्ष संजय निकुंभे, अशोकराव वेंदे, सागर पवार, राज्य कार्यकारिणी सदस्य रवी मोरे, प्रा. प्रज्ञा मोरे, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धांत बागूल, कोषाध्यक्ष संघरत्न नेरकर, डॉ. दिलीप लोखंडे कबिराकार, डॉ. मोहन मोरे, सुरेश मोरे, दीपक जाधव, रोहन मोरे, उषा मोरे, अरुणा मोरे, संगीता खैरनार, कैलास जगताप, जिल्हा सचिव सिद्धार्थ पवार आदी उपस्थित होते.
-
प्रा. वहाने म्हणाल्या, देशाला शोषणाचा इतिहास असून आजही महिला मानसिक गुलामीत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामाजिक संघटनांनी पुढे येणे आवश्यक आहे. प्रा. मोरे व श्री. बागूल यांनी विचार मांडले. जिल्हाध्यक्ष निकुंभे यांनी प्रास्ताविक केले. संघरत्न नेरकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव पवार यांनी आभार मानले.