NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal

Nashik News : मल्टिमोड्यूल हबचे 42 मजले हवेतच; एका बैठकीनंतर सारेच शांत

Nashik News : सिन्नर फाट्यालगतच्या स्टेशनवाडीला लागून असलेल्या महापालिकेच्या जागेत सिटीलिंक बससेवेचा डेपो प्रस्तावित असताना महारेल कंपनीची एक रेल्वेलाईन जाणार असल्याने महारेलला १८ एकर जागेची निकड व मेट्रो निओ कंपनीलाही ट्रान्स्पोर्ट हबसाठी तीच जागा हवी आहे.

यामुळे महारेल, मेट्रो निओ, सिटीलिंक कंपनीने मिळून ४२ मजल्यांचा ‘मल्टिमोड्यूल ट्रान्स्पोर्ट हब’ तयार करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात एक बैठक झाली, त्या व्यतिरिक्त कामकाजात कुठलीच प्रगती झालेली नाही. ( construction 42 storey Multimodal Transport Hub is not started yet nashik news)

नाशिक रोड रेल्वेस्थानकाच्या पूर्व बाजूला स्टेशनवाडी असून, त्यालगत महापालिकेची ११ एकर जागा आहे. या जागेवर महापालिकेतर्फे बसडेपो उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सिटीलिंक कंपनीच्या बसडेपोचे काम सुरू होत असताना महारेल कंपनीने प्रस्तावित पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेची लाइन त्या जागेवरून जाणार असल्याने या जागेची मागणी महापालिकेकडे केली; परंतु महापालिकेची बससेवाही महत्त्वाची असल्याने महारेल, महापालिकेने एकमताने ट्रान्स्पोर्ट हब तयार करण्याचा निर्णय घेतला होता.

दुसरीकडे मेट्रो निओ प्रकल्प येणार असल्याने सिन्नर फाट्यापर्यंत असलेले नियोजन सिन्नर फाट्याच्या पलीकडे नेण्यात आले. त्यामुळे मेट्रो निओलाही त्या जागेवर महत्त्वाचे स्टेशन उभारायचे आहे.

त्यामुळे महारेलच्या १८ एकर व महापालिकेच्या ११ एकर जागेवर मल्टिमोड्यूल हब झाल्यास त्या हबमध्ये मेट्रो निओ कंपनीलाही सहभागी करून घेण्याची मागणी बैठकीत करण्यात आली होती. त्यानुसार महारेल कंपनीतर्फे मल्टिमोड्यूल हब तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

असा असेल प्रत्येकाचा सहभाग

महारेल कंपनीतर्फे या हबसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे; तर प्रकल्पासाठी महापालिका जागा उपलब्ध करून देईल. मेट्रो निओ प्रकल्पासाठी महापालिकेचा सहभाग असला, तरी तो मिळकती उपलब्ध करून देण्यापुरता राहील.

NMC Nashik News
Tribal Ulgulan Protest : आरक्षणाला धक्का लावून तर पाहा! सत्तेतून बाहेर फेकण्याचा ‘उलगुलान’ मोर्चाप्रसंगी सरकारला इशारा

महापालिकेकडे निधी नसल्याने जागेसह इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिले जाणार असल्याने महापालिकेच्या हिश्‍श्‍यातच मेट्रो निओच्या हिश्श्याचा सहभाग असेल. महारेल कंपनीमार्फत ४२ मजल्यांचा टॉवर उभारला जाणार असल्याचे घोषित करण्यात आले; परंतु घोषणा होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटला, तरी अद्यापही एका बैठकीव्यतिरिक्त मल्टिमोड्यूल हबच्या कामात प्रगती झालेली नाही, ही निश्चितच खेदजनक बाब आहे.

मल्टिमोड्यूल हबमुळे नवीन उपनगर

प्रस्तावित मल्टिमोड्यूल हबमुळे सिन्नर फाटा भागात नवीन उपनगर उदयाला येणार आहे. रेल्वे, सिटीलिंक व मेट्रो निओ या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या सेवांचे मल्टिमोड्यूल हब होईल. घरापासून नजीकच्या अंतरावर सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार असल्याने सिन्नर फाटा भागात नागरी वसाहत वाढीस लागेल. त्यामुळे घोषणेनुसार मल्टिमोड्यूल हबची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

"मल्टिमोड्यूल हबमुळे नवे शहर या भागात तयार होईल. कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक या ठिकाणी वास्तव्याला येतील. उद्योगामुळे या भागात चांगला रोजगार उपलब्ध होईल. त्याशिवाय सोयी-सुविधा अधिक प्रमाणात मिळू शकतात, त्याचा फायदा नागरिकांना होईल." - साहेबराव खर्जुल, स्थानिक नागरिक

"परिसराची ओळख शासनाच्या महत्त्वाच्या व मोठ्या प्रकल्पामुळे होत असते. मळे विभागात शहरीकरण वाढत असताना मल्टिमोड्यूल हबमुळे रोजगाराला चालना मिळू शकते. शिवाय, उद्योगधंद्यांशी कनेक्टिव्हीटी वाढायला मदत होईल. हा प्रकल्प सिन्नर फाटा परिसराची नवीन ओळख राहील." - विजय जाधव, उद्योजक

NMC Nashik News
Sanjay Raut News : ड्रग्जप्रकरणी मंत्री भुसे, फडणवीसांचा राजीनामा घ्या : संजय राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com