नाशिक- शहर विकासासाठी विकास आराखड्यात टाकण्यात आलेले आरक्षण ताब्यात घेण्यासाठी बांधकाम सुविधा हस्तांतरीय विकास हक्क (कन्स्ट्रक्शन ॲमिनिटी टीडीआर) लागू केला जाणार आहे. यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम सुविधा हस्तांतरीय विकास हक्क समिती स्थापन करण्यास महासभेने मान्यता दिली आहे.