कळवण- आदिवासी सार्वजनिक विभागामार्फत कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात झालेल्या सर्वच विकासकामांची प्रलंबित बिले तत्काळ देण्यात यावीत, या मागणीसाठी ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. शासनाने देयके लवकरात लवकर अदा न केल्यास मंत्रालयावर ठिय्या आंदोलन करून निदर्शने करू, असा इशारा या वेळी दिला आहे.