नाशिक- कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीने वाहनतळ उभारले जाणार आहे. वाहन तळांवर स्वतंत्र खर्च करण्याऐवजी पंचवटीतील प्रभाग क्रमांक एक मधील पेठ रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या क्रिकेट मैदानाचे काम थांबवून त्याऐवजी कुंभमेळ्यात वाहन तळासाठी वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मैदानासाठी दिली जाणारा निधी देखील थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.