नाशिक- जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलानी यांनी जिल्ह्यातील तिघांचे संचालकपद रद्द केले आहे. ओझर मर्चंट बँकेचे अध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय शिंदे हे एकाच वेळी दोन ठिकाणी संचालक असल्याचा ठपका ठेवत त्यांचे संचालकपद रद्द करण्यात आले आहे. दुसरीकडे जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे व विद्यमान अध्यक्ष रवींद्र आंधळे यांच्यावर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत दोघांचे संचालकपद रद्द करण्यात आले आहे.