नाशिक- संचालक मंडळाच्या सलग तीन बैठकांना गैरहजर राहणाऱ्या दोन संचालकांसह थकबाकीदार संचालकांचे पद रद्द करण्याचा ठराव जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. निवृत्तीमुळे अपात्र ठरलेले अध्यक्ष रवींद्र आंधळे यांच्या अपात्रतेच्या निर्णयाविरोधात विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल करण्याचा निर्णय या सभेने संमत केला आहे.