सिडको- औद्योगिक वसाहतीत रात्री गुदाम फोडून कॉपर केबल चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पाच जणांची टोळी गजाआड केली असून, चोरी केलेली कॉपर वायर, दुचाकी, रिक्षा आणि मोबाईल असा तब्बल तीन लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.